कार उलटल्याने एक जण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 00:41 IST2019-06-07T00:36:54+5:302019-06-07T00:41:23+5:30
वसमत औंढा मार्गावरील भेंडेगाव पाटीजवळ नांदेडहून औरंगाबादकडे जाणाऱ्या कारचा अपघात झाल्याने एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना दुपारी चारच्या सुमारास घडली आहे.

कार उलटल्याने एक जण ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरूंदा : वसमत औंढा मार्गावरील भेंडेगाव पाटीजवळ नांदेडहून औरंगाबादकडे जाणाऱ्या कारचा अपघात झाल्याने एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना दुपारी चारच्या सुमारास घडली आहे.
वसमत औंढा मार्गे कैलास पावड़े, सुरेश डोंगरे दोघेही (रा. सिल्लोड जिल्हा औरंगाबाद) हे दोघे गाडी क्रमांक एम.एच. २० डी.जे.१८३९ ही नांदेड वरून औरंगाबादला जात होते. भरधाव वेगाने धावणारी गाडी भेंडेगाव पाटीजवळ सिमेंट रोड संपताच अपूर्ण राहिलेल्या रोडवर उलटली. त्यात कारला तीन कोलांड्या बसल्या. या अपघातात कैलास पावडे हे जागीच मरण पावले तर सुरेश डोंगरे हे गंभीर जखमी झाले. जखमीला वसमत येथे प्राथमिक उपचार करून नांदेड येथे हलविण्यात आले. घटनास्थळी मोठ्या प्रमाणे नागरिकांची गर्दी झालेली होती. घटनास्थळी सपोनि शंकर वाघमोडे, फौजदार वैभव नेटके, सपोउपनि शंकर इंगोले यांनी भेट दिली उशिरापर्यंत कुरुंदा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंद झालेली नव्हती.