घरगुती वादातून हिंगोलीत गळा दाबून एकाचा खून
By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Updated: April 28, 2023 18:50 IST2023-04-28T18:50:50+5:302023-04-28T18:50:57+5:30
याप्रकरणी एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

घरगुती वादातून हिंगोलीत गळा दाबून एकाचा खून
हिंगोली : तू आमच्या घरातून निघून का जात नाहीस, असे म्हणून एकाचा गळा दाबून जीवे मारल्याची घटना हिंगोली शहरातील सिद्धार्थ नगरात २६ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता घडली. याप्रकरणी २७ एप्रिल रोजी रात्री उशिरा हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
राजू सोनाजी नरवाडे (वय ४५, रा. सिद्धार्थनगर हिंगोली) असे मयताचे नाव आहे. तू आमच्या घरातून निघून का जात नाहीस असे म्हणून थापडाबुक्यांनी तसेच लाथा, चप्पलने मारहाण केली. त्यानंतर गळा दाबून जीवे मारल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी दीक्षा राजू नरवाडे (रा. सिद्धार्थनगर हिंगोली, ह.मु. खराबवाडी ता. खेड) यांच्या फिर्यादीवरून राहूल गणेश देशमाने (रा. सिद्धार्थनगर हिंगोली) याचेविरूद्ध हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदझाला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, पोलिस निरीक्षक सोनाजी आम्ले, पोलिस उपनिरीक्षक अशोक कांबळे, महिला पोलिस उपनिरीक्षक वाळके यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देवून आरोपीस ताब्यात घेतले. पोलिस उपनिरीक्षक कांबळे तपास करीत आहेत.