One hundred and fifty convicted of stoning in Hingoli | दगडफेक प्रकरणातील दीडशे जणांवर गुन्हा
दगडफेक प्रकरणातील दीडशे जणांवर गुन्हा

ठळक मुद्देशहरात १२ आॅगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास दोन गटांत वाद झाला होता.

हिंगोली : शहरात १२ आॅगस्ट रोजी दोन गटांत वाद झाल्याने तणाव निर्माण झाला होता. शहरात दंगलसदृश स्थिती निर्माण करून काहींनी तुफान दगडफेक केली. वाहनांची तोडफोड करून लाखोंचे नुकसान केले. त्यामुळे शहरात अशांतता निर्माण करणाºयांविरूद्ध पोलिसांनी १३ आॅगस्ट रोजी जवळपास १५० जणांवर विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले असून काहींना ताब्यात घेतले आहे. 

हिंगोलीत शहरात १२ आॅगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास दोन गटांत वाद झाला होता. यावेळी शहरात काही समाजकंटकांनी तुफान दगडफेक करत वाहनांचे नुकसान केले. त्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. १३ आॅगस्ट रोजी नेहमीप्रमाणे शहरात शांततामय वातावरण निर्माण झाले होते. शहरात अशांतता पसरविल्याप्रकरणी जवळपास दीडशे जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे घटनेच्या दुसºया दिवशी शहरात सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासनातर्फे जागो-जागी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

शहरात दंगल घडविणाऱ्या आरोपींची धरपकड मोहीम सकाळपासूनच सुरू झाली होती. यावेळी सात ते आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. सायंकाळी उशिरापर्यंत  आरोपींना पकडण्याची मोहीम सुरूच होती. विशेष म्हणजे राखी पौर्णिमा व मंगळवार बाजाराच्या दिवशीही नेहमी गर्दीने गजबजणाºया हिंगोली शहरात शुकशुकाट दिसून आला. तर मंगळवार बाजारातही गर्दी दिसून आली नाही. त्यामुळे घटनेच्या दुसºया दिवशीही काही प्रमाणात शहरात तणावपूर्ण स्थिती होती. परंतु सोमवारी झालेल्या दोन गटांतील वादामुळे मात्र सामान्य जनतेचे हाल झाले. वाहनांची तोडफोड केल्याने लाखोंचे नुकसान झाले. त्यात बसेस बंद असल्याने अनेकांची गैरसोय झाली. बसेस फोडल्याने हिंगोली आगाराचे नुकसान झाले. शाळकरी विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. तर दुकाने बंद असल्याने बाजारपेठेवर परिणाम झाला. विशेष म्हणजे शहरात कालच्या घटनेचे पडसाद उमटणार नाहीत, याबाबत पोलीस प्रशासना कडून खबरदारी घेण्यात येत आहे. त्यामुळे १३ आॅगस्ट रोजी शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही, याची प्रशासनातर्फे खबरदारी घेत शहरात जागो-जागी तगडा पोलीस बंदोबस्त लावला होता. शहरात पोलिसांची गस्त सुरूच आहे.
मार्गदर्शन शहर ठाण्यात शांतता समितीची बैठक

१२ आॅगस्ट रोजी दोन गटांत वाद झाल्याने शहरात तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे शहरात शांततामय वातावरण निर्माण करण्यासाठी प्रशासनातर्फे १३ आॅगस्ट रोजी हिंगोली येथील शहर ठाण्यात शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली.४शांतता कमिटीच्या बैठकीस जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, मुख्याधिकारी रामदास पाटील, डीवायएसपी सुधाकर रेड्डी, पोनि अशोक घोरबांड यांच्यासह विविध सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.४हिंगोली शहरात सोमवारी दोन गटांतील वादामुळे तणाव निर्माण झाल्याने शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली होती. यावेळी शहरात शांतता राखण्याचे व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. यावेळी मान्यवरांची भाषणे झाली. जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी व पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी शहरात शांतता राखण्याचे आवाहन केले.


Web Title: One hundred and fifty convicted of stoning in Hingoli
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.