शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लेखीसाठी एक फिजिकलसाठी दुसराच; फिंगरप्रिंट न जुळल्याने उघड झाला CISF भरती घोटाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2022 12:07 IST

केंद्रीय सुरक्षा बलाच्या भरतीसाठी तोतया परीक्षार्थी बसवणाऱ्या टोळीचे हिंगोली कनेक्शन उघड;मुंबई पोलिसांनी वारंगा फाटा येथून एकास केली अटक

आखाडा बाळापूर (जि. हिंगोली) : सीआयएसएफ अर्थात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलात नोकरी मिळवून देण्यासाठी मोठे रॅकेट कार्यरत आहे. उमेदवाराच्या नावे बनावट परीक्षार्थी लेखी परीक्षा देतोय तर ग्राउंडमध्ये तिसराच उमेदवार उभा राहतोय. या प्रकरणाचे पाळेमुळे मुंबई पोलीस शोधत असून टोळीचे कनेक्शन हिंगोली जिल्ह्यातील तोंडापूरपर्यंत पोहोचले आहे. तोंडापूर येथील एकास मुंबई पोलिसांनी वारंगाफाटा येथून अटक केली.

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआयएसएफ) अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू होती. यासाठी मुंबई येथील चेंबूर परिसरातील केंद्रावर लेखी परीक्षा पार पडली. ऑगस्ट २०२१ मध्ये परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना मध्य प्रदेशातील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, आरटीसी कार्यालय (जि. खरगोन) येथे शारीरिक चाचणीसाठी बोलावण्यात आले होते. त्यामध्ये एका विद्यार्थ्यांने शारीरिक क्षमता चाचणीत गुणांकन मिळवले. परंतु त्याचे बोटाचे ठसे जुळत नसल्याचे लक्षात आले. याबाबत तपासणी केली असता लेखी परीक्षेत दिलेले बोटाचे ठसे व फिजिकलसाठी मैदानात आलेल्या उमेदवाराच्या बोटाचे ठसे वेगवेगळे असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून संदीप रतनसिंग मान या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या उपनिरीक्षकाने सदर प्रकरणी चौकशी करून मध्य प्रदेशातील बडवाल येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तो आरसीएफ पोलीस ठाणे, चेंबूर या ठिकाणी वर्ग करण्यात आला. यात गोविंद बाबूराव शिरडे (रा. जांभूळ सावली, ता. हदगाव, जि. नांदेड) यास रंगेहाथ पकडून त्याच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. बनावट उमेदवार म्हणून सदर आरोपीने भरती प्रक्रियेत सहभाग नोंदवला होता. त्याला आरसीएफ पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर पोलीस कोठडीत त्याने सगळा प्रकार सांगितला.

सुरक्षा बलात भरती प्रक्रियेसाठी बनावट परीक्षार्थी परीक्षेत बसवून अनेक उमेदवारांकडून पैसे घेऊन भरती करण्याचा गोरख धंदा सुरू असल्याचे लक्षात आले. या टोळीचे नांदेड कनेक्शन लक्षात घेतल्यानंतर आरोपी गोविंद शिरडे याने लेखी परीक्षेसाठी हिंगोली जिल्ह्यातील तोंडापूर येथील एक जण असल्याचे सांगितले होते. त्यानुसार मुंबई येथील आरसीएफ पोलीस ठाणे, चेंबूरचे पोलीस उपनिरीक्षक आर. एन. बाबानगरे, पोलीस नायक पाटील, मोकल यांचे पथक १८ ऑगस्ट २०२२ रोजी वारंगा फाटा येथे सकाळी दाखल झाले.

केंद्रीय सुरक्षा बलाची भरतीवारंगा फाटा येथील एका झेरॉक्स दुकानामधून आरोपी गंगाधर संभाजी आम्ले (रा. तोंडापूर ) व त्याचा पार्टनर अशा दोघांना अटक केली. तोतया परीक्षार्थी तयार करून भरती प्रक्रियेत गोरखधंदा करणाऱ्या टोळीचे हिंगोली कनेक्शन उघड झाले आहे. चेंबूर पोलिसांनी सदर आरोपीस अटक करून चौकशी केली. पार्टनरचा सदर गुन्ह्याशी काहीही संबंध नसल्याचे लक्षात आल्याने त्यास सोडून दिले. तर एका आरोपीस घेऊन पुढील तपासासाठी मुंबईकडे रवाना झाले असल्याची माहिती बाळापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार पंढरीनाथ बोधनापोड यांनी दिली आहे.

भरतीसाठी पाच लाख घेतले...केंद्रीय बलात भरती करण्यासाठी उमेदवाराकडून पाच लाख रुपये घेतले असल्याचे आरोपीने कबूल केल्याचे पोलिसांनी सांगितले. पाच लाखात सीआयएसएफमध्ये ट्रेडमॅन म्हणून भरती करण्यात येत होते. यामध्ये औरंगाबाद येथील मुख्य सूत्रधार असून त्याचे मुंबई कनेक्शन असल्याचेही सांगण्यात येते.

तोंडापूर येथील आरोपी उच्चशिक्षित...तोंडापूर येथील आरोपी बी. एस. डब्ल्यू. अर्थात सामाजकार्य या विषयात पदवी मिळवलेला आहे. सध्या तो वारंगा फाटा येथे ऑनलाइन सर्विसेस व झेरॉक्स सेंटरचे दुकान थाटून व्यवसाय करत आहे. लेखी परीक्षेत सहभागी असल्यानेच त्याला अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :examपरीक्षाCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीHingoliहिंगोली