एमपीएससीला १५७४ परीक्षार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 01:00 AM2018-05-14T01:00:44+5:302018-05-14T01:00:44+5:30

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत १३ मे रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १२ यावेळेत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजत्रित गट-ब परीक्षा हिंगोलीतील ८ उपकेंद्रावरून घेण्यात आली. १ हजार १६८ परीक्षार्थ्यांपैकी १ हजार ५७४ जणांनी परीक्षा दिली.

 MPSC 1574 candidate | एमपीएससीला १५७४ परीक्षार्थी

एमपीएससीला १५७४ परीक्षार्थी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत १३ मे रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १२ यावेळेत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजत्रित गट-ब परीक्षा हिंगोलीतील ८ उपकेंद्रावरून घेण्यात आली. १ हजार १६८ परीक्षार्थ्यांपैकी १ हजार ५७४ जणांनी परीक्षा दिली.
परीक्षा कालावधीत जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यासाठी ८ परीक्षा केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ लागू करण्यात आले होते. परीक्षा केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परीक्षा केंद्रावर मुख्य प्रवेशद्वारावर पोलीस यंत्रणेमार्फत तपासणी करूनच परीक्षार्थिंना कक्षात सोडण्यात येत होते.
हिंगोलीत आदर्श महाविद्यालय हिंगोली भाग-अ- ३३६ पैकी २८३ जणांनी परीक्षा दिली. तर ५३ गैरहजर राहिले. तसेच आदर्श महाविद्यालय भाग-ब- ३३६ पैकी २९६ जणांनी परीक्षा दिली. ४० गैरहजर होते. सेक्रेट हार्ट इंग्लिश स्कूल २४० पैकी २०४ उपस्थित होते. तर ३६ गैरहजर राहिले. शिवाजी महाविद्यालय - १९२ पैकी १५४ हजर तर ३८ गैरहजर होते. तसेच जिल्हा परिषद बहुविध प्रशाला - १९२ पैकी १५४ परीक्षेस हजर होते. तर ३८ गैरहजर राहिले. जि. प. कन्या शाळा -१६८ पैकी १४१ जणांनी परीक्षा दिली असून २७ अनुपस्थित होते. संतश्रेष्ठ नामदेव महाराज पठाडे विद्यालय -१६८ पैकी १४० हजर होते, २८ गैरहजर होते. तसेच सरजूदेवी भिकूलाल भारूका आर्य कन्या विद्यालय -२३६ पैकी २०२ जणांनी परीक्षा दिली. ३४ जण परीक्षेस गैरहजर राहिले. सदर परीक्षा सुरळीत पार पडली.

Web Title:  MPSC 1574 candidate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.