झाडाला गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 00:28 IST2018-05-21T00:28:55+5:302018-05-21T00:28:55+5:30

तालुक्यातील जलालदाभा येथील तरूण गजानन दत्तराव मोधे (२४) याने स्वत:च्या शेतात सागाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २० मे रोजी सकाळी उघडकीस आली.

 Milk suicides by taking a tree to death | झाडाला गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

झाडाला गळफास घेऊन युवकाची आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्क
औंढा नागनाथ/कळमनुरी : तालुक्यातील जलालदाभा येथील तरूण गजानन दत्तराव मोधे (२४) याने स्वत:च्या शेतात सागाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २० मे रोजी सकाळी उघडकीस आली.
औरंगाबाद येथे खासगी कंपनीत कामाला जातो म्हणून घरून तीन दिवसांपूर्वी निघालेला मयत गजानन मोधे आलाच नाही. वडिलाने त्याचा शोध घेण्यासाठी औरंगाबाद गाठले; परंतु सकाळीच त्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे समजताच वडील माघारी फिरले. त्याचा अंत्यसंस्कार जलालदाभा येथील स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात करण्यात आला. युवकाच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.

Web Title:  Milk suicides by taking a tree to death