जिल्ह्यात सर्वच केंद्रात ‘एमबीबीएस’ डाॅक्टर, त्यात २१ कंत्राटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:29 AM2021-03-05T04:29:43+5:302021-03-05T04:29:43+5:30

जिल्ह्यात सद्य:स्थितीमध्ये २५ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. यामध्ये ६२ पदे हे एमबीबीएस डाॅक्टरांची आहेत. यापैकी सेनगाव तालुक्यातील ...

MBBS doctors in all the centers in the district, including 21 contracts | जिल्ह्यात सर्वच केंद्रात ‘एमबीबीएस’ डाॅक्टर, त्यात २१ कंत्राटी

जिल्ह्यात सर्वच केंद्रात ‘एमबीबीएस’ डाॅक्टर, त्यात २१ कंत्राटी

Next

जिल्ह्यात सद्य:स्थितीमध्ये २५ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. यामध्ये ६२ पदे हे एमबीबीएस डाॅक्टरांची आहेत. यापैकी सेनगाव तालुक्यातील कापडसिंगी येथील प्रा. आ. केंद्रातील पद हे रिक्त आहे. हे पदही लवकरच भरण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

हिंगोली तालुक्यातील फाळेगाव, सिरसम, भांडेगाव, नर्सी नामदेव, वसमत तालुक्यात हयातनगर, पांगरा शिंदे, कुरुंदा, हट्टा, गिरगाव, टेंभूर्णी, सेनगाव तालुक्यात गोरेगाव, कापडिसंगी, कवठा, कळमनुरी तालुक्यात मसोड, रामेश्वर तांडा, डोंगरगाव, आ. बाळापूर, पोत्रा, वाकोडी तर औंढा तालुक्यात लोहरा, पिंपळदरी, शिरडशहापूर, जवळा बाजार, सिद्धेश्वर येथे प्रा. आ. केंद्रे सध्या कार्यरत आहेत.

जिल्ह्यातील २४ ‘एमबीबीएस’ व ‘बीएएमएस’ डाॅक्टांमध्ये २१ डाॅक्टर हे कंत्राटी स्वरुपाची आहेत. यामध्ये फाळेगाव १, सिरसम २, नर्सी नामदेव १, मसोड २, आखाडा बाळापूर १, हयातनगर २, लोहरा २, पिंपळदरी १, सिद्धेश्वर २, कुरुंदा १, साखरा १, कापडसिंगी १, गोरेगाव २ आणि कवठा येथे १ अशी संख्या आहे.

७ ठिकाणी ‘बीएएमएस’ डाॅक्टर

जिल्ह्यातील मसोड १, डोंगरकडा १, लोहरा १, सिद्धेश्वर १, सिरसम १, कापडिसंगी १, गोरेगाव १ असे सात ठिकाणी ‘बीएएमएस’ डाॅक्टर कार्यरत आहेत.

प्रतिक्रिया

जिल्ह्यातील २४ प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ‘एमबीबीएस’ डाॅक्टरांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सेनगाव तालुक्यातील कापडसिंगी येथील पद रिक्त आहे. तेही लवकरच भरण्यात येईल.

- डाॅ. शिवाजी पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, हिंगोली

Web Title: MBBS doctors in all the centers in the district, including 21 contracts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.