विषारी द्रव प्राशन करून विवाहितेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 18:51 IST2019-07-26T18:50:56+5:302019-07-26T18:51:21+5:30
सेंदूरसना शिवारातील एका शेतात विषारी द्रव्य घेतले

विषारी द्रव प्राशन करून विवाहितेची आत्महत्या
शिरडशहापूर (हिंगोली ) : औंढा नागनाथ तालुक्यातील संघनाईक तांडा, सेंदूरसना शिवारातील एका शेतात विवाहितेने विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना २५ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली.
विमल विजय पवार (३२, रा. संघनाईक तांडा) या विवाहिते सेंदूरसना शिवारातील शेतात विषारी द्रव प्राशन करून केले. सदर महिला बेशुद्ध अवस्थेत पडलेली नातेवाईकांना दिसली असता सासरा परसराम व नवरा विजय यांनी तात्काळ बैलगाडीमध्ये टाकून सेंदूरसनापर्यंत आणले, व तेथून एका खाजगी वाहनाने औंढा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी विवाहितेस मयत घोषित केले. सासरा परसराम पवार यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार नेव्हल तपास करीत आहेत.