विवाहितेवर बलात्कार; बाळापूर ठाण्यात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 23:31 IST2018-09-28T23:30:56+5:302018-09-28T23:31:10+5:30

कळमनुरी तालुक्यातील तोंडापूर येथील एका ३५ वर्षीय विवाहितेवर तिच्या राहत्या घरी बलात्कार केल्याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 Marriage rape; Filed in Balapur Thane | विवाहितेवर बलात्कार; बाळापूर ठाण्यात गुन्हा दाखल

विवाहितेवर बलात्कार; बाळापूर ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
वारंगाफाटा : कळमनुरी तालुक्यातील तोंडापूर येथील एका ३५ वर्षीय विवाहितेवर तिच्या राहत्या घरी बलात्कार केल्याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कळमनुरी तालुक्यातील तोंडापूर येथील संतोष शिवकुमार शिवणकर या तरुणाने दिनांक २४ सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पीडित महिलेच्या घरात घुसून बलात्कार केला.
पीडित महिलेने दिनांक २७ सप्टेंबर रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात आरोपी संतोष शिवणकर याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सविता बोधनकर करीत आहेत. घटनेनंतर आरोपी संतोष शिवणकर फरार झाला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.

Web Title:  Marriage rape; Filed in Balapur Thane