Maratha Reservation : वसमत येथे सकल मराठा समाजाच्या बेमुदत ठिय्या आंदोलनाला सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 18:38 IST2018-08-02T18:36:12+5:302018-08-02T18:38:19+5:30
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज सकाळी ८ वाजल्यापासून उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर सकल सकल मराठा समाजाच्या वतीने बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आले.

Maratha Reservation : वसमत येथे सकल मराठा समाजाच्या बेमुदत ठिय्या आंदोलनाला सुरूवात
वसमत (हिंगोली ) : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज सकाळी ८ वाजल्यापासून उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर सकल सकल मराठा समाजाच्या वतीने बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आले.
सकल मराठा समाजाकडून उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात मराठा आरक्षणासह विविध मागण्या तातडीने मान्य कराव्यात, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलनात माघार घेतली जाणार नाही असे म्हटले आहे. हे आंदोलन बेमुदत असून ते साखळी पद्धतीने केले जाणार आहे. यात तालुक्यातील सर्व सर्कलमधील सकल मराठा समाज सहभागी झाला आहे.