शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2024 13:39 IST

Maharashtra Assembly Election 2024: मुंबई येथून नांदेडकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सची चिखली फाट्यावर ‘स्थिर निगराणी’ पथकाने चौकशी केली असता ३ बॅगा पैशाने भरलेल्या आढळून आल्या. यामध्ये जवळपास १ कोटी रुपये असल्याचे आढळून आले

- इस्माईल जहागीरदारवसमत (जि. हिंगोली) - मुंबई येथून नांदेडकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सची चिखली फाट्यावर ‘स्थिर निगराणी’ पथकाने चौकशी केली असता ३ बॅगा पैशाने भरलेल्या आढळून आल्या. यामध्ये जवळपास १ कोटी रुपये असल्याचे आढळून आले असून या पैशाची मोजदाद सुरु आहे. ही ट्रॅव्हल्स मुंबईवरुन येत होती. परंतु कुठे जात होती? हे मात्र अजून तरी कळाले नाही.

विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून, सर्वत्र प्रचाराची धामधूम सुरु झाली आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हा निवडणूक प्रशासन व पोलिस प्रशासनाने तपासणी सुरु केली असून नियमांचे पालन करा, अशा सूचनाही देत आहेत. १७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजेदरम्यान वसमत तालुक्यातील चिखली फाट्यावर ‘स्थिर निगराणी’ पथकाने नांदेडकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्सची तपासणी केली. यावेळी त्यामध्ये १ कोटी रुपये आढळले. यानंतर पथकाने ट्रॅव्हल्स पोलिस राहोटीच्या बाजूला लावली आणि पैशाची मोजदाद करणे सुरु केले आहे.

ट्रॅव्हल्समध्ये सापडल्या तीन बॅगा...निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्रत्येक वाहनांची तपासणी केली जात आहे. मागच्या काही दिवसांपासून पोलिस व निवडणूक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुट्याही रद्द करण्यात आल्या आहेत. आज रविवारचा दिवस असला तरी सर्वच अधिकारी कर्तव्यावर आहेत. मुंबईवरुन आलेली ट्रॅव्हल्स चिखलीफाटा येथे थांबविली व त्याची कसून चौकशी केली. या दरम्यान तीन मोठ्या बॅगा सापडल्या आहेत. 

माहिती कळताच पोलिस तत्परतेने दाखल...मुंबईवरुन आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये तीन बॅगा सापडल्याची माहिती चिखलीफाटा येथे कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी वरिष्ठांना दिली. यानंतर लगेच हट्टा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संग्राम जाधव, महसूल विभागाचे अधिकारी व स्थिर निगराणी पथकाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Hingoliहिंगोली