शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 16:22 IST

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पथकाकडून गृहमंत्री अमित शाह यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करण्यात आली.

Maharashta Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी निवडणूक आयोगाकडूनही कठोर पावलं उचलण्यात आली आहेत. अशातच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या हेलिकॉप्टर आणि बॅगांच्या तपासणीवर राजकारण पेटलं आहे. उद्धव ठाकरे यांनी या तपासणीचे व्हिडीओ काढत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याही बॅगांची तपासणी व्हायला हवी अशी मागणी केली होती. त्यानंतर आता हिंगोलीत निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी अमित शाह यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी केली आहे. यावेळी भाजप सर्व नियमांचे पालन करत असल्याचेही अमित शाह यांनी म्हटलं आहे.

गेल्या चार दिवसांत विविध ठिकाणी निवडणूक आयोगाकडून उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आली होती. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर आता हिंगोली येथे गृहमंत्री अमित शाह यांची बॅग तपासण्यात आली. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी शाह यांची बॅग तपासली. सोमवारी यवतमाळ जिल्ह्यात आणि मंगळवारी लातूरमध्ये ,तर बुधवारी कोकण दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरे यांची बॅग तपासण्यात आली होती.

"आज महाराष्ट्राच्या हिंगोली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी माझ्या हेलिकॉप्टरची तपासणी केली. भाजप निष्पक्ष निवडणुका आणि निवडणूक व्यवस्थेवर विश्वास ठेवतो आणि माननीय निवडणूक आयोगाने बनवलेल्या सर्व नियमांचे पालन करतो. आपण सर्वांनी निष्पक्ष निवडणूक प्रणालीमध्ये योगदान दिले पाहिजे आणि भारताला जगातील सर्वात मजबूत लोकशाही कायम ठेवण्यासाठी आपले कर्तव्य बजावले पाहिजे," असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, याआधी  भाजप महाराष्ट्रने बुधवारी एक व्हिडिओ पोस्ट केला होता ज्यामध्ये निवडणूक अधिकारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बॅग तपासत होते. यावेळी केवळ दिखाव्यासाठी संविधानाचा आधार घेणे पुरेसे नाही आणि प्रत्येकाने घटनात्मक व्यवस्थेचेही पालन केले पाहिजे,  काही नेत्यांना नाटक करण्याची सवय आहे, असे भाजपने या पोस्टमध्ये म्हटले होते.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४HingoliहिंगोलीAmit Shahअमित शाहUddhav Thackerayउद्धव ठाकरेElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग