शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
6
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
7
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
8
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
10
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
11
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
12
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
13
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
14
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
15
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
16
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
18
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

Lok Sabha Election 2019 : हिंगोलीत सेनेचा उमेदवार जाहीर, काँग्रेसमध्ये शांतताच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 6:18 PM

उपरा उमेदवार लादल्याचा आरोपही काही शिवसैनिकांतून होत आहे. 

ठळक मुद्देखा. राजीव सातव हेच लढणार की अन्य कोणी?सातव यांची लढायची इच्छा असली तरीही त्यांच्याकडे गुजरातच्या प्रभारी पदाची आहे

- विजय पाटील

हिंगोली : शिवसेनेने हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर केली असून, मतदारसंघाचे लक्ष आता काँग्रेसच्या उमेदवाराकडे लागलेले आहे. खा. राजीव सातव हेच लढणार की अन्य कोणी उमेदवार? हा तिढा कायम आहे.मागील काही दिवसांपासून शिवसेनेत उमेदवारीवरून प्रचंड रस्सीखेच होती. बाहेरून आलेल्यांना, परक्यांना उमेदवारी देऊ नका, असे म्हणून पत्रकार परिषदाही घेण्यात येत होत्या. वसमतचे डॉ. जयप्रकाश मुंदडा यांचीच उमेदवारी अंतिम मानली जात होती; मात्र नांदेडचे आ. हेमंत पाटील व सुभाष वानखेडे यांचाही मराठा कार्ड म्हणून शिवसेनेने विचार चालविला होता. यात अखेर हेमंत पाटील यांचे नाव निश्चित झाले. 

एकीकडे शिवसेनेची उमेदवारी जाहीर झाली असताना काँग्रेसमध्ये मात्र शांतता आहे. या उमेदवारीबाबतही कोणी बोलायला तयार नाही. खा. राजीव सातव हेच लढणार की अन्य कोणी? याबाबतही अनिश्चितताच आहे. दोन दिवसांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी नांदेडात बैठक घेतली. त्यात मतदारसंघातील आ. प्रदीप नाईक, माजी आ. जयप्रकाश दांडेगावकर, माजी आ. भाऊ राव पाटील गोरेगावकर, माजी आ. माधवराव पा. जवळगावकर यांची मते जाणून घेतली. 

सातव यांची लढायची इच्छा असली तरीही त्यांच्याकडे गुजरातच्या प्रभारी पदाची जबाबदारीही आहे. त्यामुळे त्यांना येथे वेळ देणे शक्य आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शिवाय ते नसतील तर अ‍ॅड. शिवाजी जाधव, माजी खा. सुभाष वानखेडे यांच्या नावांचाही काँग्रेसकडून विचार सुरू असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. त्यामुळे शिवसेनेने जसा नवा चेहरा मैदानात उतरविला तसाच काँग्रेसचाही प्रयत्न असल्याचे समजते. काही दिवसांपूर्वी आ. संतोष टारफे यांनीही चाचपणी केली होती. खा. सातव यांचे ते खंदे समर्थक आहेत. 

काँग्रेसच्या बैठकीची चर्चाहिंगोली लोकसभा मतदारसंघात काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीचा उमेदवार निश्चित करण्यासाठी झालेल्या बैठकीची चर्चा मतदारसंघात सुरू झाली आहे. विद्यमान खासदार या मतदारसंघात असताना प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी ही बैठक घेतल्याने उमेदवार बदलाचे तर संकेत नाहीत ना, अशी चर्चा रंगत आहे.

उपरा उमेदवार लादल्याचा आरोपएकीकडे जल्लोष होत असताना मतदारसंघात आधीपासूनच असलेल्या कोणालाच उमेदवारी न देता नांदेडचे आमदार असलेल्या हेमंत पाटील यांच्या रुपाने उपरा उमेदवार लादल्याचा आरोपही काही शिवसैनिकांतून होत आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस