शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

लिगो प्रयोगशाळा शास्त्रज्ञांच्या निवासस्थानांचा प्रस्ताव त्रुटीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 10:36 PM

लिगो इंडिया प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनीचे भूसंपादन पूर्ण झाले असले तरीही या प्रकल्पासाठी आवश्यक इतर बाबींचे प्रस्ताव आता वेग घेत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : लिगो इंडिया प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनीचे भूसंपादन पूर्ण झाले असले तरीही या प्रकल्पासाठी आवश्यक इतर बाबींचे प्रस्ताव आता वेग घेत आहेत. जामवाडी येथील निवासस्थानांसाठी तीन त्रुटी काढल्या असून त्या दूर करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. तर दुधाळवाडीच्या रस्त्याचा प्रस्ताव उपविभागीय अधिकाºयांकडे पाठविला आहे.औंढा नागनाथ तालुक्यातील दुधाळा येथे गुरुत्वीय लहरींच्या सूक्ष्म अभ्यासासाठी उभारण्यात येत असलेल्या या प्रयोगशाळेसाठी मागील दोन ते तीन वर्षांपासून तयारी सुरू आहे. आता जमिनीचा प्रश्न सुटला. मात्र या ठिकाणी अभ्यासा साठी येणाºया शास्त्रज्ञांना निवासस्थानांची व्यवस्था करण्यास हिंगोली तालुक्यातील जामवाडी येथील गायरान जमिनीचा प्रस्ताव दिला आहे. त्यात शासनाने तीन त्रुटी काढल्या. यात आरआरसी दर, ग्रामपंचायतीचा ठराव व जि.प. सीईओंचे संमतीपत्र आवश्यक आहे. या गावाला त्या तुलनेत गायरान जमीन शिल्लक राहणार की नाही, याची चाचपणी यातून घेतली जात आहे. याशिवाय दुधाळवाडीच्या रस्त्याचा भूसंपादन विभागाकडे सादर केलेला प्रस्ताव त्यांनी वसमतच्या उपविभागीय अधिकाºयांकडे पाठविला आहे. याशिवाय पाणीपुरवठा, महावितरणचे स्वतंत्र प्रस्ताव तयार होणार आहेत. त्या-त्या विभागाकडून अपेक्षित अंदाजपत्रके सादर करून लिगो व्यवस्थापनाशीच थेट बोलणी होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडेही याच पद्धतीने निधी थेट वर्ग करावा लागणार आहे.या प्रकल्पासाठी आता सर्वच प्रकारची तयारी अंतिम टप्प्यात असल्याने आगामी काही दिवसांत कामाच्या शुभारंभाचा मुहूर्त निघण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

टॅग्स :Hingoliहिंगोलीgovernment schemeसरकारी योजना