जमीन आरोग्यपत्रिकेचे कळमनुरीत वाटप करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 23:17 IST2018-12-04T23:16:59+5:302018-12-04T23:17:25+5:30
तालुका कृषी अधिकारी कार्यालय २०१८-१९ यावर्षी ३९११ माती नमुने काढण्याचे लक्षांक देण्यात आले होते. २७ नोव्हेंंबर अखेर ३७०३ नमुने काढून कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर येथे तपासणीसाठी सादर करण्यात आले आहे. २१ गावांचे जमीन आरोग्य पत्रिका तयार केल्या असून ७७६३ आरोग्य पत्रीका कृषी सहाय्यकामार्फत ५ डिसंबर रोजी वाटप करण्यात येणार आहेत.

जमीन आरोग्यपत्रिकेचे कळमनुरीत वाटप करणार
लोकमत न्यूज नेटवर्क
कळमनुरी: तालुका कृषी अधिकारी कार्यालय २०१८-१९ यावर्षी ३९११ माती नमुने काढण्याचे लक्षांक देण्यात आले होते. २७ नोव्हेंंबर अखेर ३७०३ नमुने काढून कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर येथे तपासणीसाठी सादर करण्यात आले आहे. २१ गावांचे जमीन आरोग्य पत्रिका तयार केल्या असून ७७६३ आरोग्य पत्रीका कृषी सहाय्यकामार्फत ५ डिसंबर रोजी वाटप करण्यात येणार आहेत.
तेलंगवाडी, पोत्रा, गोर्लेगाव, निमटोक इत्यादी गावातील शेतकऱ्यांना पोत्रा तालुका कळमनुरी येथे डॉ. सतीश पाचपुते जि.प. सदस्य यांच्या हस्ते वाटप करून शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात येणार आहेत. ४ डिसेंबर रोजी कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर येथे कृषी कर्मचारी व शेतकरी यांना जमीनचे आरोग्य पत्रीका वापर करण्यासाठी प्रशिक्षण आयोजित केले असून लाभ घेण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी जी.बी. कल्याणपाड यांनी केले आहे.