कुरूंदवाडीत विवाहितेच्या अंगावर रॉकेल ओतून जिवे मारण्याचा प्रयत्न; चौघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 19:41 IST2019-07-12T19:40:23+5:302019-07-12T19:41:01+5:30

जाळून मारण्याच्या उद्देशाने आगकाडी अंगावर फेकण्याचा प्रयत्न करत जीवे मारण्याचा प्रयत्न केले.

Kurundwadi tried to kill kerosene on the married women; Crime on Fours | कुरूंदवाडीत विवाहितेच्या अंगावर रॉकेल ओतून जिवे मारण्याचा प्रयत्न; चौघांवर गुन्हा

कुरूंदवाडीत विवाहितेच्या अंगावर रॉकेल ओतून जिवे मारण्याचा प्रयत्न; चौघांवर गुन्हा

कुरूंदा (हिंगोली ) : वसमत तालुक्यातील कुरूंदवाडी येथे विवाहितेस माहेराहून शेती कामासाठी २ लाख रुपये घेवून ये म्हणून अंगावर रॉकेल ओतून जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना १० जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी कुरूंदा पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न केल्याने चौघांविरूद्ध ११ जुलै रोजी रात्री उशिराने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कुरूंदवाडी येथील मनिषा देलमाडे (२३) यांना सासरकडील मंडळींनी त्रास देत तु दिसायला सुंदर नाहीस, तुला स्वयंपाक येत नाही व तुझे वडिलाकडून शेती कामासाठी दोन लाख रुपये घेवून ये, या कारणावरून शारिरीक व मानसीक छळ  केला. १० जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता फिर्यादीस स्वयंपाक खोलीत ढकलून दिले व तुला आता जाळून टाकतो म्हणून डब्यातील रॉकेल अंगावर ओतले आणि जाळून मारण्याच्या उद्देशाने आगकाडी अंगावर फेकण्याचा प्रयत्न करत जीवे मारण्याचा प्रयत्न केले.

याप्रकरणी फिर्यादी महिला मनिषा देलमाडे यांच्या जबाबावरून कुरूंदा पोलीस ठाण्यात आरोपी नवरा निलेश देलमाडे, सासरा प्रभाकर देलमाडे, सासू संगिता देलमाडे, नणंद सारीका तिनेवार या चौघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी डिवायएसपी सतिष देशमुख, सपोनि सदानंद येरेकर, फौजदार वैभव नेटके आदींनी भेट देवून घटनेचा पंचनामा केला आहे.

Web Title: Kurundwadi tried to kill kerosene on the married women; Crime on Fours