शासकीय कामात अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 23:39 IST2018-08-31T23:39:15+5:302018-08-31T23:39:18+5:30

पोलिसांसोबत अरेरावी व बाचाबाची करणाऱ्या दोघांविरूद्ध हिंगोली शहर ठाण्यात गुरूवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे

 Interrupt government work | शासकीय कामात अडथळा

शासकीय कामात अडथळा

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : पोलिसांसोबत अरेरावी व बाचाबाची करणाऱ्या दोघांविरूद्ध हिंगोली शहर ठाण्यात गुरूवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे
हिंगोली शहरातील गांधी चौक परिसरात पोलीस कर्तव्य बजावत असताना त्यांच्यासोबत दोन फळविक्रेत्यांनी अरेरावी केली. त्यामुळे शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी हिंगोली शहर ठाण्यात आरोपी शेख मुसबीर व मो. मुखीद या दोघांविरूद्ध हिंगोली शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघाही आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोनि उदयसिंग चंदेल यांनी दिली.
हिंगोली शहरातील गांधी चौक परिसरात फळविक्रेत्यांचे हातगाडे शिस्तीत लावण्यासाठी सांगितले असता आरोपींनी पोलीस कर्मचाºयांसोबत अरेरावी केली. त्यामुळे दोघांना ताब्यात घेऊन आरोपींविरूद्ध शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title:  Interrupt government work