हिंगोली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील खरबी फाटा येथे कारवाई करून १८०० रुपये किमतीचा अवैध गावठी दारूसाठा जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष वाठोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात तुकाराम सखाराम काळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच राहुली खु. ते दाटेगाव शिवारात अठराशे रुपये किमतीचा अवैध दारूसाठा जप्त केला. याप्रकरणी शेख रहिमोद्दीन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संजय डोरले याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मौजे कलगाव येथे पोलिसांनी कारवाई करून दोन हजारांचा गावठी दारू साठा जप्त केला. याप्रकरणी विठ्ठल भडंगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर माळहिवरा ते सिरसम जाणाऱ्या रोडवर पोलिसांनी कारवाई करून ९०० रुपये किमतीचा देशी दारु साठा जप्त केला. याप्रकरणी सोपान सांगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रमेश जाधव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवैध दारूसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:27 IST