शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

परस्पर रोहित्र दिल्यास फौजदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 11:56 PM

रोहित्र दुरुस्ती करणाऱ्या एजन्सीज पूर्ण क्षमतेने काम करीत नाहीत. त्यामुळे दररोज दोन ते तीनच्या सरासरीने रोहित्र दुरुस्तीची आकडेवारी समोर येत आहे. मात्र काही जणांना परस्पर रोहित्र दुरुस्त करून दिले जात आहे. मात्र आता दररोज ५ रोहित्रांची दुरुस्ती झालीच पाहिजे, अशा कडक सूचना देत फौजदारीचा इशारा आ.तान्हाजी मुटकुळे यांनी दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : रोहित्र दुरुस्ती करणाऱ्या एजन्सीज पूर्ण क्षमतेने काम करीत नाहीत. त्यामुळे दररोज दोन ते तीनच्या सरासरीने रोहित्र दुरुस्तीची आकडेवारी समोर येत आहे. मात्र काही जणांना परस्पर रोहित्र दुरुस्त करून दिले जात आहे. मात्र आता दररोज ५ रोहित्रांची दुरुस्ती झालीच पाहिजे, अशा कडक सूचना देत फौजदारीचा इशारा आ.तान्हाजी मुटकुळे यांनी दिला.जिल्हाधिकारी कार्यालयात मुटकुळे यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी जगदीश मिनियार यांच्या उपस्थितीत ही बैठक घेतली. यावेळी महावितरणचे प्रभारी कार्यकारी अभियंता औरादे यांच्यासह सर्वच उपअभियंत्यांची उपस्थिती होती. तर रोहित्र दुरुस्तीच्या एजन्सीजही बोलावल्या होत्या. यावेळी मिनियार यांनी महावितणच्या अधिकाºयांना रोहित्र दुरुस्तीतील अडचणी विचारल्या. त्यात आॅईलची समस्या असल्याचे सांगण्यात आले. मात्र १00 रोहित्र दुरुस्ती होतील, एवढे आॅईल परभणीला आले. तेथून आणल्यावर येत्या पाच दिवसांत एवढ्या डीपींची दुरुस्ती होईल, असे सांगण्यात आले. तर दुरुस्तीच्या दराचा प्रश्न आधीच मिटल्याचे सांगण्यात आले. जवळपास १00 डीपी आधीच दुरुस्तीचे पडून असून या एजन्सींना दुरुस्तीस दिलेल्या डीपींची संख्याही ९0 च्या घरात आहे. त्यामुळे एजन्सीकडे डीपी तत्काळ दुरुस्तीसाठी पाठवून त्याची यादी सादर करण्यास मिनियार यांनी सांगितले. तर सध्या २१ डीपी दुरुस्त केलेले असून उद्या १२ आणखी मिळतील, असे सांगण्यात आले.आॅईल पुरवठा झाल्याने रोहीत्र दुरुस्त तत्काळ व्हावी. एक वर्षांच्या गॅरंटी काळात रोहित्र जळाल्यास तत्काळ दुरुस्त करून द्यावे, त्याची वेगळी यादी तयार करावी, अशा सूचनाही मुटकुळे यांनी दिल्या. तर परस्पर रोहित्र वाटपाची चौकशी करण्यासही सांगितले.वेदना समजून घ्या : अधिकाºयांना सुनावलेप्रभारी कार्यकारी अभियंता औरादे यांना मुटकुळे म्हणाले, आपणही शेतकरीपुत्र आहात. एक महिना डीपी न दिल्यास काय घडते, हे माहिती आहे. मग शेतकºयांच्या वेदना का समजून घेत नाहीत, असा सवाल केला. एजन्सीज परस्पर डीपी देतात, वीजचोरी रोखण्याचा पत्ता नाही. वीजचोरांवर कठोर कारवाई करा. यात लक्ष न घालणाºया अभियंत्यावरही कारवाई करा. वीजचोरांमुळे प्रामाणिक लोकांचे मरण नको. प्रतीक्षा यादीनुसार डीपी द्या. परस्पर डीपी देण्याच्या प्रकारामुळे असंतोष निर्माण होत आहे.शासनाने थकबाकी वसुुली करू नये, असा आदेश दिला आहे. त्यामुळे आपण सक्ती करू नका, असे आ.मुटकुळे म्हणाले. तर डीपी जळाल्यास वेगळा निर्णय असल्याचे अभियंत्यांनी सांगितले. त्यावर ही वसुली तर थकबाकीचीच असल्याचे सांगून सक्ती नको, असे मुटकुळे म्हणाले.

टॅग्स :Hingoliहिंगोलीmahavitaranमहावितरण