शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्ण शर्माने हातात चेंडू असूनही संजू सॅमसनला रन आऊट नाही केले, विराटचे डोक फिरले 
2
पुणे अपघात प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय; १७ वर्षांच्या 'बाळा'ची बालसुधारगृहात रवानगी
3
"मद्य घोटाळा असो किंवा नॅशनल हेराल्ड घोटाळा...", PM मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
4
RCB चे तारे ज़मीन पर! महत्त्वाच्या सामन्यात शरणागती, राजस्थान रॉयल्सची सुरेख गोलंदाजी
5
हरियाणामध्ये राहुल गांधींसमोरच उफाळला वाद,  काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये बाचाबाची, त्यानंतर...
6
फुल राडा! RR चा कोच कुमार संगकारा तिसऱ्या अम्पायरला जाब विचारायला गेला अन्... Video
7
रोव्हमन पॉवेलचा Stunner कॅच; फॅफ ड्यू प्लेसिस माघारी, पण विराट कोहलीने रचला विक्रम भारी
8
विराट कोहलीला 'फसव्या' चेंडूवर युझवेंद्र चहलने गंडवले; विक्रमवीराला तंबूत पाठवले, Video 
9
भाजप किती जागा जिंकेल? अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय तज्ञाने केली भविष्यवाणी, म्हणाले...
10
Fact Check: राष्ट्रपती मुर्मू यांच्या रंगावर भाष्य करतानाचा पंतप्रधान मोदींचा 'तो' Video एडिटेड
11
PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच
12
पुण्यातील अपघाताबाबत राहुल गांधींचा तो दावा गैरसमजातून, असीम सरोदेंनी सांगितली कायद्यातील तरतूद
13
उच्च न्यायालयाचा ममता सरकारला दणका; 2010 नंतर दिलेली सर्व OBC प्रमाणपत्रे रद्द
14
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उष्णतेमुळे 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
15
धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश
16
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
17
वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला
18
राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
19
पुणे अपघात: 'या' ३ प्रश्नांची उत्तरे आता तुम्हीच द्या; अंबादास दानवेंनी केली अजित पवारांची कोंडी
20
टोळी, खंडणी, सोनेतस्करी.. बेपत्ता बांगलादेशी खासदाराचा कोलकातामध्ये सापडला मृतदेह, तिघांना अटक

पाणंद रस्त्यांचे दीड कोटी पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 12:40 AM

पालकमंत्री पाणंद रस्ता योजनेतील कामे महसूल व जि.प. प्रशासन एकमेकांवर ढकलत असल्याने या कामांना मंजुरीच न मिळाल्याने दीड कोटी रुपयांचा निधी अजूनही पडूनच असल्याचे चित्र आहे. या योजनेत प्रत्येक पंचायत समितीला ३0 लाख रुपये प्राप्त झाले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : पालकमंत्री पाणंद रस्ता योजनेतील कामे महसूल व जि.प. प्रशासन एकमेकांवर ढकलत असल्याने या कामांना मंजुरीच न मिळाल्याने दीड कोटी रुपयांचा निधी अजूनही पडूनच असल्याचे चित्र आहे. या योजनेत प्रत्येक पंचायत समितीला ३0 लाख रुपये प्राप्त झाले होते.जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद योजनेतून कामे करण्यासाठी आधी ग्रामपंचायतींनी प्रस्तावच दाखल न केल्याने बोंब होती. मात्र नंतर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी विविध बैठकांतून या विषयावर आवाज उठविला. तसेच ग्रामपंचायतींनीही जागे होत प्रस्ताव दाखल केले. त्यानंतर यात पुढील प्रक्रिया करण्यासाठी मात्र टोलवाटोलवीच सुरू आहे.जि.प.च्या बांधकाम उपविभागाने अंदाजपत्रके बनविली नाही, म्हणून काहीकाळ प्रस्ताव ठप्प होते. तर पुढे या योजनेत समन्वयाचा अभाव असल्याने कामेच झालीच नाहीत. आता सर्व पाचही तालुक्याला अनुदानापोटी ३0 लाख रुपये शिल्लकच आहेत.पाणंद रस्त्यांची कामे करण्यासाठी एरवी ६0:४0 चे प्रमाण पूर्ण करावे लागत होते. तर जलसंधारणाची कामे होत नसल्याने यात अडचणी येत होत्या. पालकमंत्री पाणंद योजनेमुळे ही अडचण दूर झाली होती. शिवाय पुढे या रस्त्याची इतरही कामे विविध योजनांतून करण्यास मुभा असल्याने याकडे कल वाढताना दिसत होता. मात्र या योजनेला प्रशासकीय उदासीनतेमुळे लागलेली घरघर अजूनही कायम आहे.पहिल्याच कामांना मंजुरी दिली जात नसल्याने नवीन कामे कोणी प्रस्तावित करीत नसल्याचे दिसत आहे.चालू आर्थिक वर्षात २0 हजार ६४६ मस्टर काढण्यात आले. यापैकी १८ हजार १0६ मस्टर वेळेत काढले. मात्र २५४0 मस्टर विलंबाने निघाले. यात ४.१९ कोटी रुपयांची मजुरी मजुरांना विलंबाने मिळाली. औंढा ना. ७६.४९ लाख, वसमत-१६.४३ लाख, हिंगोली-१.२८ कोटी, कळमनुरी-८६.७७ लाख तर सेनगावात १.२२ कोटी रुपये विलंबाने अदा झाले. यात औंढा १५ हजार, वसमत ४ हजार, हिंगोली ३५ हजार, कळमनुरी ४२ हजार तर सेनगावात ३३ हजारांचा दंड लागला. यापैकी ५५ हजार वसूल झाले. तर ७५ हजारांची वसुली बाकी आहे.विलंब शुल्काचे आतापर्यंत २.६८ लाख वसूल करण्यात आले आहेत. यात औंढा १७ हजार, वसमत ३६0८, हिंगोली-१.२७ लाख, कळमनुरी- ५९ हजार, सेनगाव ६१ हजार अशी रक्कम आहे.

टॅग्स :Hingoli z pहिंगोली जिल्हा परिषदfundsनिधी