खुडज येथे घराला आग; लाखो रुपयांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2023 00:35 IST2023-02-21T00:34:00+5:302023-02-21T00:35:00+5:30

आग कशामुळे लागली हे मात्र कळू शकले नाही.

house fire at khudaj hingoli a loss of lakhs of rupees | खुडज येथे घराला आग; लाखो रुपयांचे नुकसान

खुडज येथे घराला आग; लाखो रुपयांचे नुकसान

रामदास टाले, खुडज (जि. हिंगोली) : सेनगाव तालुक्यातील खुडज येथील एका शेतकऱ्याच्या घराला अचानक आग लागली. या आगीत शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. आग कशामुळे लागली हे मात्र कळू शकले नाही.


२० फेब्रुवारीला शेतकरी विजय दत्तराव राहटे यांच्या घराला दुपारी चार वाजण्यादरम्यान अचानक आग लागली. आग आटोक्यात आणण्यासाठी ग्रामस्थांनी मदत केली. परंतु, तोपर्यंत संसारोपयोगी साहित्य व अन्नधान्य जळून गेले होते. विजय राहटे हे कुटुंबासह शेतातच राहत असल्याने घरी कोणीच नव्हते. त्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली. हा प्रकार शेजारी राहणाऱ्या व्यक्तीच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी विजय राहटे यांना सांगितले.

आग आटोक्यात आणण्यासाठी ग्रामस्थांना खूप प्रयत्न करावे लागले. आगीचे रौद्र रूप लक्षात घेऊन ग्रामस्थांनी सेनगाव येथील नगरपंचायतीच्या अग्निशमन दलास पाचारण केले होते. अग्निशमन गाडी आल्यानंतर काही वेळातच आग आटोक्यात आणली. तोपर्यंत घरावरील टिनपत्रे, अन्नधान्ये, कपडालत्ता आदी जळून खाक झाले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: house fire at khudaj hingoli a loss of lakhs of rupees