Hingoli: भानामती करण्यासाठी नवीन बांधलेल्या घरातच मांडली पूजा; अज्ञाताविरुद्ध गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 15:30 IST2025-05-24T15:25:08+5:302025-05-24T15:30:02+5:30

दोन दिवसांत तीनवेळा वाळू घातलेले कपडे जाळले

Hingoli: Worshipping Bhanamati in a newly built house; Crime against unknown | Hingoli: भानामती करण्यासाठी नवीन बांधलेल्या घरातच मांडली पूजा; अज्ञाताविरुद्ध गुन्हा

Hingoli: भानामती करण्यासाठी नवीन बांधलेल्या घरातच मांडली पूजा; अज्ञाताविरुद्ध गुन्हा

आखाडा बाळापूर/ वारंगाफाटा (जि. हिंगोली) : भानामती करण्याच्या कारणासाठी नवीन बांधलेल्या घरात कोणी तरी पूजा मांडली. हळद-कुंकू, अक्षता बिबे व कागदी चिठ्ठ्या मांडून जादूटोणा केला. नव्या दुचाकी गाडीची सीट जाळली तर दोन दिवसांत तीनवेळा वाळू घातलेले कपडे जाळले. कोणी तरी जिवे मारण्याच्या उद्देशाने जादूटोणा करत असल्याच्या तक्रारीवरून बाळापूर पोलिस ठाण्यात आज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

कळमनुरी तालुक्यातील दाभडी येथील रहिवासी असलेले नवनाथ दिगंबर बोंढारे (वय २६) यांच्या गावातील राहत्या घरी व चुलत भावाच्या नवीन बांधकाम केलेल्या घरी २१ मे रोजी रात्री साडेनऊ वाजता ते २३ मे रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास कोणी तरी अज्ञात व्यक्तीने भानामती करण्याच्या उद्देशाने पूजा मांडली. पूजेमध्ये हळद-कुंकू, अक्षता, बिबे, कागदी चिठ्ठ्यांची मांडणी ठेवून काही चिठ्ठ्याही टाकल्या होत्या. पूजा मांडली त्या ठिकाणी नवीन दुचाकी ठेवली होती. त्या गाडीची सीट पेटवून दिली, तसेच भावाच्या पत्नीचे कपडेही पेटवून दिले.

दोन दिवसांत तीन वेळा वाळू घातलेल्या साड्या, बाथरूम जवळ ठेवलेले कपडे, अंगणात वाळू घातलेले साडी जाळली एका चिठ्ठीमध्ये ‘तू बांधलेले घर पाड नाही तर तुझ्या बायकोला जिवे मारतो,’ असे लिहिलेले आढळले आहे. या सगळ्या प्रकारामुळे भयभीत झालेल्या नवनाथ दिगंबर बोंढारे यांच्या तक्रारीवरून बाळापूर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध जादूटोणा केल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास ठाणेदार पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे करत आहेत.

Web Title: Hingoli: Worshipping Bhanamati in a newly built house; Crime against unknown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.