Hingoli: टेम्पो आणि दुचाकीच्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू, किन्होळा फाट्याजवळील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 17:09 IST2025-07-15T17:09:23+5:302025-07-15T17:09:42+5:30
हा अपघात नांदेड ते औढा नागनाथ मार्गावरील किन्होळा फाट्याजवळ झाला

Hingoli: टेम्पो आणि दुचाकीच्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू, किन्होळा फाट्याजवळील घटना
वसमत (जि. हिंगोली ) : तालुक्यातील कवठा फाट्याकडे येणाऱ्या टेम्पोचा आणि जिंतूर फाट्याकडे जाणाऱ्या दुचाकीचा किन्होळा फाट्याजवळ समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. यात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघात मंगळवारी दुपारी २ वाजता झाला.
वसमत तालुक्यातील किन्होळा फाट्याजवळ १५ जुलै रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास जिंतूर फाट्याकडे जाणाऱ्या दुचाकीची आणि कवठा फाट्याकडे येणाऱ्या टेम्पोची समोरासमोर भीषण अपघात झाला. अपघातात दुचाकीवरील शुभम राजकुमार महाजन (२९), अंकुश महावीर महाजन (३२, दोघे रा. मंगळवार पेठ, वसमत) हे दोघे गंभीर जखमी झाले. माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनि गजानन बोराटे, भगवान आडे,अजय पंडित, लोखंडे आदि कर्मचाऱ्यांची अपघातस्थळी धाव घेतली. जखमींना पोलीस आणि नागरिकांनी उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. येथे वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून दोघांना मृत घोषित केले.
दरम्यान, अपघातानंतर औंढा नागनाथ -नांदेड मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. पंचनामा करत पोलिसांनी वाहतुक सुरळीत केली. याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.