In Hingoli, a truck crushed two persons on a two-wheeler | हिंगोलीत भरधाव ट्रकने दुचाकीवरील दोघांना चिरडले

हिंगोलीत भरधाव ट्रकने दुचाकीवरील दोघांना चिरडले

ठळक मुद्देहदगाव महामार्गावरील वारंगा फाटा जवळील घटनाट्रक चालकाने दुचाकीला जवळपास दीडशे मीटर अंतरापर्यंत फरफटत नेले

वारंगा फाटा ( हिंगोली ) : हदगाव महामार्गावरील वारंगा फाटा जवळील बीएसएनएल मनाेऱ्याजवळ माेटारसायकल व ट्रकच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ३० नाेव्हेंबर राेजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

हदगाव महामार्गावरून तुकाराम राघोजी काळे (वय ६२), रावसाहेब गणपतराव लोमटे (वय ५३) हे दुचाकी ( एमएच २६ एए ३७०७ ) वरून वारंगा फाटाकडे जात होते. पाठीमागून येणाऱ्या ट्रकने ( एमएच ३४ एबी ९२८१ )  मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या धडकेमध्ये काळे व लोमटे यांचा जागीच मृत्यू झाला. ट्रक चालकाने दुचाकीला जवळपास दीडशे मीटर अंतरापर्यंत फरफटत नेले असल्याची माहिती आहे. अपघात स्थळावरून ट्रकचालकाने नांदेडकडे प्रसार होत असताना नागरिकांच्या मदतीने पोलीस उपनिरीक्षक हनमंत नकाते, बीट जमादार शेख बाबर, अर्शद खान यांनी वारंगा फाटा येथे ट्रक चालकाला पकडले.

या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे सपोनि रविकांत हुंडेकर हे पोलीस कर्मचाऱ्यांसह दाखल झाले. यानंतर दोघांचे मृतदेह आखाडा बाळापूर येथे शवविच्छेदन करण्याकरिता नेण्यात आले. याप्रकरणी बाळापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेमुळे वारंगा फाटा व चुंचा येथील ग्रामस्थांची गर्दी जमली हाेती. काळे यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, सून, नातवंड तर लोमटे यांच्या पश्चात पत्नी, तीन मूली, एक मुलगा असा परिवार आहे.

Web Title: In Hingoli, a truck crushed two persons on a two-wheeler

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.