शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Hingoli Santosh Bangar : नेत्यांना यात्रेत बंदी, गावकऱ्यांनी गावाबाहेरच अडवला आमदार संतोष बांगर यांचा ताफा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2023 18:39 IST

यात्रेत कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांना बोलवायचं नाही अशी परंपरा आहे. तरीदेखील आमदार बांगर आपल्या कार्यकर्त्यांसह पोहचले.

कळमनुरी (हिंगोली):  राज्यात सत्तांतर झाल्यापासून अनेकदा ठाकरे गट आणि शिंदे गटाचे नेते आमने सामने आले आहेत. यातच नेहमीच चर्चेत असणारे हिंगोलीचे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांच्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे आणि शिंदे गटात वाद झाला. हिंगोली जिल्ह्यातील वारंगा मसाई येथे मसाई मातेची यात्रा सुरू आहे. यात्रेत कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांना बोलवायचं नाही अशी परंपरा आहे. मात्र असं असतानाही आमदार बांगर या यात्रेत गेल्याने गावकऱ्यांनी गावाबाहेरच त्यांचा ताफा अडवला. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच राडा पाहायला मिळाला. 

नेहमी वादाच्या भोवऱ्यात असणारे आमदार बांगर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. हिंगोली जिल्ह्यातील वारंगा मसाई येथे दरवर्षी मसाई मातेची यात्रा भरते. या यात्रेत भाविकांची  मोठ्याप्रमाणावर गर्दी असते. या यात्रेत कोणत्याही राजकीय पक्षातील नेत्यांना बोलावलं जात नाही. अनेक वर्षांची ही परंपरा पाहता जिल्ह्यातील राजकीय पुढारी देखील या यात्रेला जाण्यासाठी टाळतात. पण, आज शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह यात्रेत हजेरी लावली. पण, यावेळी गावकऱ्यांनी त्यांना गावात प्रवेश दिला नाही.

शेकडो वर्षांपासून ही यात्रा या गावांमध्ये भरते. यात्रेनिमित्त या गावासह पंचक्रोशीतील हजारो भाविक येथे सहभागी होत असतात. यंदा ही यात्रा 7 जानेवारी रोजी भरली आहे. ग्रामस्थांनी आमदार बांगर यांना मंदिराच्या अलीकडेच रोखले आणि आज देवीच्या दर्शनासाठी येऊ नका, यात्रा झाल्यानंतर या असे सांगितले. यावेळी गावच्या यात्रेत राजकारण नको म्हणत शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. मात्र पोलीस प्रशासन व स्थानिक नागरिकांच्या मध्यस्थीने हा वाद मिटला आणि आमदार बांगर यांना दर्शनासाठी आतमध्ये सोडण्यात आलं.

वारंगा मसाई येथे कोणताही वाद झाला नाही, दोन पार्ट्यांमध्ये वाद होता. मी देवीचे दर्शन घेतले व माझा कार्यकर्त्यांनी जयघोष केला. कोणताही वाद येथे झाला नाही.- आ.संतोष बांगर

टॅग्स :Hingoliहिंगोलीkalamnuri-acकळमनुरीEknath Shindeएकनाथ शिंदे