एसीबीच्या कार्यालयाचे हिंगोलीत उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 01:00 IST2018-05-11T01:00:36+5:302018-05-11T01:00:36+5:30

शहरातील पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन १० मे रोजी अपर पोलीस महासंचालक विवेक फणसळकर यांच्या हस्ते झाले.

 Hingoli opening of ACB office inaugurated | एसीबीच्या कार्यालयाचे हिंगोलीत उद्घाटन

एसीबीच्या कार्यालयाचे हिंगोलीत उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शहरातील पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन १० मे रोजी अपर पोलीस महासंचालक विवेक फणसळकर यांच्या हस्ते झाले.
यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, पोलीस अधीक्षक संजय लाटकर, डॉ. सचिन गुंजाळ, सुनील जैतापूरकर, देशपांडे यांची उपस्थिती होती. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधकचे उपअधीक्षक कुलकर्णी, बेंद्रे, बेंबडे तसेच नांदेड परिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी फणसळकर यांनी बैठक घेऊन मार्गदर्शन केले. तर कार्यालय परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी नितीन देशमुख, शेख उमर, अभिमन्यू कांदे, सुभाष आढाव, ओमप्रकाश पंडितकर, संतोष दुमाने, शेख जमीर, रुद्रा कबाडे, विजयकुमार उपरे, गजानन आगलावे, प्रमोद थोरात, अवी कीर्तनकार यांनी परिश्रम घेतले.

Web Title:  Hingoli opening of ACB office inaugurated