शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

'गाठ माझ्याशी आहे!';निकृष्ट दर्जाच्या कामामुळे आमदार नवघरे आक्रमक, रस्त्याचा केला 'पंचनामा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 16:26 IST

दीड वर्षातच रस्त्याचे वाजले बारा! आ. राजू नवघरे यांनी उखडून दाखवला महामार्ग; कंत्राटदाराची केली कानउघाडणी

वसमत (जि. हिंगोली): गेल्या दहा वर्षांपासून कासवगतीने सुरू असलेल्या आणि अत्यंत निकृष्ट दर्जाच्या ठरलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरून आमदार राजू नवघरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. कल्याण ते निर्मल या राष्ट्रीय महामार्गाची झालेली दुर्दशा पाहून आमदारांनी स्वतः रस्त्यावर उतरून कामाचा 'पंचनामा' केला. "काम नीट करा, अन्यथा गाठ माझ्याशी आहे," असा थेट इशारा त्यांनी यावेळी संबंधित अभियंता आणि कंत्राटदाराला दिला.

पोट-कंत्राटदारीचा बसला फटकावसमत शहरातून जाणाऱ्या या महामार्गाचे काम २०१७ मध्ये सुरू झाले होते. मात्र, हे काम पोट-कंत्राटदारीच्या (Sub-contracting) विळख्यात अडकल्याने अद्याप पूर्ण झालेले नाही. धक्कादायक बाब म्हणजे, वर्षभरापूर्वी झालेल्या रस्त्यावर आताच मोठमोठे खड्डे पडले असून नवनिर्मित दुभाजकही कोसळू लागले आहेत. प्रत्यक्ष पाहणी दरम्यान, आमदारांनी परभणी मार्ग ते मालेगाव मार्ग या पट्ट्यातील उखडलेला रस्ता दाखवत कंत्राटदाराला जाब विचारला.

नागरिकांचा जीव धोक्यातदादरा पूल परिसरात रस्ता करण्यासाठी खोदून ठेवलेल्या खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. "जनतेच्या पैशातून होणाऱ्या कामात असा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. खोदून ठेवलेले खड्डे तातडीने बुजवावेत, ही शेवटची ताकीद आहे," अशा शब्दांत आ. नवघरे यांनी प्रशासनाला सुनावले. या पाहणीमुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कामाचे वाभाडे निघाले असून आता तरी कामात सुधारणा होणार का? याकडे वसमतकरांचे लक्ष लागले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : MLA Warns Contractor: Fix Poor Road Work or Face Consequences!

Web Summary : MLA Navghare, angered by poor national highway work in Wasmat, inspected the road. He warned the contractor to improve the quality, citing substandard construction, delays due to sub-contracting, and dangerous potholes endangering citizens. He demanded immediate repairs.
टॅग्स :highwayमहामार्गHingoliहिंगोली