शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

सात दिवसांच्या बंदनंतर हिंगोलीचा मोंढा सुरू; सोयाबीनच्या दरात २०० रुपयाने वाढ

By रमेश वाबळे | Updated: November 16, 2023 18:35 IST

सोयाबीनचे भाव ४ हजार ८०० ते ५ हजार २२१ पर्यंत भाव

हिंगोली : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर येथील मोंढा व हळद मार्केटयार्ड सात दिवसांपासून बंद होते. त्यानंतर १६ नोव्हेंबरपासून शेतमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू झाले. या दिवशी सोयाबीनचा भाव दोनशे रुपयांनी वधारला. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. तर हळद दोनशे ते अडीचशे रुपयांनी घसरली.

यंदा पावसाच्या लहरीपणामुळे सोयाबीन उत्पादनात घट झाली. त्यातच बाजारात भावही समाधानकारक मिळत नसल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. दीपावलीअगोदर सोयाबीन पाच हजारांचाही पल्ला गाठत नसल्याने शेतकऱ्यांत निराशा होती; परंतु दिवाळीतील आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी मिळेल त्या भावात सोयाबीन विक्री करावी लागली.

गुरुवारी मात्र सोयाबीनचा भाव जवळपास दोनशे रुपयांनी वधारला. किमान ४ हजार ८०० ते कमाल ५ हजार २२१ रुपये भाव मिळाला. सध्या मिळणारा भाव लागवडीच्या तुलनेत कमी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. किमान ६ हजार रुपये भाव मिळावा, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.

हरभऱ्याच्या दरात तीनशेंनी वाढ...रब्बीची पेरणी अंतिम टप्प्यात आली असून, पेरणी होऊन शिल्लक राहिलेला हरभरा शेतकरी मोंढ्यात विक्रीसाठी आणत आहेत. गुरुवारी हरभऱ्याचे दर तीनशे रुपयांनी वधारले. या दिवशी १५ क्विंटल हरभरा विक्रीसाठी आला होता. ५ हजार २०० ते ६ हजार रुपये भाव मिळाला.

हळद आणखी घसरली...येथील बाजार समितीच्या संत नामदेव मार्केट यार्डात ऑगस्ट, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात हळदीला सरासरी १५ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला होता. त्यानंतर मात्र भावात घसरण झाली. ८ नोव्हेंबर रोजी सरासरी ११ हजार ६६२ रुपये भाव मिळाला होता. त्यानंतर दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मार्केट यार्ड बंद होते. गुरुवारी भाव वधारण्याची शक्यता होती. मात्र, जवळपास दोनशे ते अडीचशे रुपयांनी भाव घसरले. सरासरी ११ हजार ४०० रुपये भाव मिळाला. घसरलेल्या भावामुळे शेतकऱ्यांची निराशा झाली.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीHingoliहिंगोली