- गंगाधर सितळेडोंगरकडा (जि. हिंगोली) : कष्ट करण्याची जिद्द आणि त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली, तर शेती हा तोट्याचा नाही तर फायद्याचा व्यवसाय ठरू शकतो, हे कळमनुरी तालुक्यातील सुकळी वीर येथील युवा शेतकरी ओंकार सोनाजी मुटकुळे यांनी सिद्ध करून दाखवले आहे. अवघ्या ७२ दिवसांच्या कालावधीत त्यांनी टरबूज पिकातून विक्रमी उत्पादन घेत थेट आंतरराष्ट्रीय बाजारपेठेपर्यंत मजल मारली आहे.
पारंपरिक शेतीला फाटा देत शेतकरी ओंकार मुटकुळे यांनी दीड एकर क्षेत्रावर टरबूजाच्या वाणाची लागवड केली. प्रगतशील शेतकरी मारुती खुडे यांच्या मार्गदर्शनाखाली टरबूज लागवड केली. त्यासाठी जमिनीची मशागत, दर्जेदार रोपांची निवड आणि संतुलित खत व्यवस्थापन केले. ठिबक सिंचन आणि आधुनिक कीड नियंत्रणामुळे अवघ्या ७२ दिवसांत टरबूजाचा दर्जेदार प्लॉट तयार झाला.
पारंपरिक पिकांना फाटा देत बाह्य बाजारपेठेचा अभ्यास करून घेतलेल्या या निर्णयाचा त्यांना मोठा फायदा झाला. थेट नेपाळ येथील व्यापाऱ्यांनी शेतावरच २९ टन टरबूज प्रतिकिलो २२ रुपये ९० पैशांनी खरेदी केला, तर उर्वरित माल अयोध्या येथील व्यापाऱ्याने उचलला. त्यामुळे मध्यस्थ टाळून शेतकऱ्याला योग्य दर मिळाला.
नेपाळ अन् अयोध्येची बाजारपेठ काबीजया टरबूजाचा दर्जा इतका उत्कृष्ट होता की, मध्यस्थांची साखळी तोडून थेट नेपाळच्या व्यापाऱ्यांनी शेतावर धाव घेतली. एकूण २९ टन माल २२ रुपये ९० पैसे प्रति किलो या दराने नेपाळला रवाना झाला. उर्वरित मालाची खरेदी अयोध्या येथील व्यापाऱ्यांनी केली.
Web Summary : Hingoli's Omkar Mutkule achieved success in watermelon farming using modern technology. He sold 29 tons to Nepal traders at ₹22.90/kg, bypassing intermediaries. Remaining stock was purchased by traders from Ayodhya.
Web Summary : हिंगोली के ओंकार मुटकुले ने आधुनिक तकनीक का उपयोग करके तरबूज की खेती में सफलता हासिल की। उन्होंने 29 टन तरबूज 22.90 रुपये प्रति किलोग्राम पर नेपाल के व्यापारियों को बेचे, जिससे बिचौलियों को दरकिनार कर दिया गया। शेष स्टॉक अयोध्या के व्यापारियों ने खरीदा।