शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
2
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
3
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
4
Google: नव्या वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करा आणखी स्वस्तात; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर्स!
5
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
6
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
7
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
8
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
9
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
10
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
11
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
12
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
13
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
14
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
15
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
16
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
17
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
18
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
19
Sports Events Schedule 2026 : क्रीडा प्रेमींसाठी नवे वर्ष आहे एकदम खास! कारण...
20
मराठी की हिंदू, महापौर कोण होणार? भाजपा नेते कृपाशंकर सिंह पुन्हा बोलले; "मुंबईचा महापौर..."
Daily Top 2Weekly Top 5

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ACB Raid; करसहायक २० हजारांची लाच घेताना अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 18:46 IST

व्यावसायिक कर, त्यावरील व्याज आणि दंड रद्द करण्यासाठी मागितली नोटिस

हिंगोली : व्यावसायिक कराची (प्रोफेशनल टॅक्स) नोटीस रद्द करण्यासाठी २० हजार रुपयांची लाच घेताना वस्तू व सेवा कर विभागाच्या कर सहाय्यकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने १ जानेवारी रोजी रंगेहाथ पकडले आहे.

उमेश साहेबराव सरकटे असे पकडलेल्या कर सहायकाचे नाव आहे. यासंदर्भात तक्रारदाराने ३१ डिसेंबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली होती. तक्रारदारास ३१ मार्च २०२५ पर्यंतचा व्यावसायिक कर, त्यावरील व्याज आणि दंड असे मिळून एकूण ४३,९०४ रुपये भरण्याची नोटीस बजावण्यात आली होती. ही नोटीस घेऊन उमेश सरकटे २९ डिसेंबर रोजी तक्रारदाराच्या दुकानावर गेले होते. "तुम्हाला आलेली नोटीस मी रद्द करू शकतो. जर तुम्हाला ४३,९०४ रुपये भरायचे नसतील, तर त्यासाठी ३० हजार रुपये द्यावे लागतील," असे म्हणत त्यांनी लाचेची मागणी केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ३१ डिसेंबर रोजी या तक्रारीची पडताळणी केली असता, लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार १ जानेवारी रोजी सापळा रचण्यात आला. वस्तू व सेवा कर कार्यालयाच्या बाजूस असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील रस्त्यावर उमेश सरकटे यांनी तडजोडीअंती पंचांसमक्ष २० हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्याच वेळी पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले.

झडती आणि पुढील तपासआरोपीची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे २९५० रुपये रोख, आधारकार्ड, मतदानकार्ड, पॅनकार्ड, अंगठी आणि एक मोबाइल असा मुद्देमाल मिळून आला. याप्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच, आरोपी उमेश सरकटे यांच्या रिसोड येथील घराची झडती घेण्याचे आदेश वाशिम येथील ‘एसीबी’च्या पोलिस निरीक्षक अलका गायकवाड यांना देण्यात आल्याची माहिती ‘एसीबी’ने दिली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : GST Tax Assistant Arrested Taking Bribe on New Year's Day

Web Summary : Hingoli: A GST tax assistant was arrested on New Year's Day for accepting a ₹20,000 bribe to cancel a professional tax notice. ACB caught Umesh Sarkate red-handed after a complaint. He demanded ₹30,000, reduced from ₹43,904 due, to halt the notice.
टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागHingoliहिंगोलीGSTजीएसटी