हिंगोलीत पिकअप ट्रक उलटून १५ उसतोड कामगार जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 16:17 IST2019-03-12T16:15:53+5:302019-03-12T16:17:45+5:30
सर्व जखमी वाशीम जिल्ह्यातील असून त्यांच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

हिंगोलीत पिकअप ट्रक उलटून १५ उसतोड कामगार जखमी
आखाडा बाळापूर ( हिंगोली ) : बाळापुरपासून जवळ असलेल्या साळवा फाट्यावर एक पिकअप ट्रक उलटून १५ उसतोड कामगार जखमी झाल्याची घटना आज सकाळी ९ वाजता घडली. सर्व जखमी वाशीम जिल्ह्यातील असून त्यांच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, वाशिम जिल्ह्यातील १५ ते २० कामगार ऊस तोडणीसाठी सोलापूरमधील माढा तालुक्यातील गोरडवाडी येथे गेले होते. ऊस तोडणीचे काम संपवून ते पिकअप ट्रकमधून परतीचा प्रवास करत होते. दरम्यान, सकाळी ९ वाजेच्या सुमारास बाळापूरपासून जवळ असलेल्या साळवा फाट्यावर समोरून येणाऱ्या ट्रकने हूल दिल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकअप उलटला.
यामुळे त्यामधील पंधरा कामगार जखमी झाले. अंबादास राठोड, रवि राठोड, आत्माराम राठोड, गोविंद राठोड, मधुकर जोगदंड, गजानन कांबळे, अनुसयाबाई राठोड ,दिलीप डोंगरदिवे, भास्कर बळीराम पठाडे अशी जखमींची नावे आहेत.