चोरांच्या शोधातील पोलिसांना सापडले गुटखा तस्कर; ९ लाखांचा मुद्देमाल जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 12:22 IST2022-05-13T12:19:56+5:302022-05-13T12:22:04+5:30

आज पहाटे चोरांच्या मागावर असलेल्या पोलिसांना मनाठा पाटी ते चिखली - बाळापुर रोडवर एक संशयास्पद कार आढळून आली

Gutkha smugglers found by police in search of thieves; 9 lakh confiscated | चोरांच्या शोधातील पोलिसांना सापडले गुटखा तस्कर; ९ लाखांचा मुद्देमाल जप्त

चोरांच्या शोधातील पोलिसांना सापडले गुटखा तस्कर; ९ लाखांचा मुद्देमाल जप्त

आखाडा बाळापूर (हिंगोली ): चोरांनी हैदोस घातलेल्या भागात आज पहाटे गस्तीवर असताना बाळापूर पोलिसांना दोघेजण गुटख्याची तस्करी करत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी दोघांवर कारवाई करत एकूण 8 लाख 35 हजार 80 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

याप्रकरणी पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळापुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चिखली,कान्हेगाव, फुटाना, चुंचा, दाती, कुर्तडी या भागात गेल्या काही दिवसांपासून चोरांचा वावर वाढला आहे.  आज पहाटे चोरांच्या मागावर असलेल्या पोलिसांना मनाठा पाटी ते चिखली - बाळापुर रोडवर एक संशयास्पद कार ( एम. एच. 04 -जी डी 3320 ) आढळून आली. पोलिसांनी पाठलाग करत कारला अडवले. 

कारमध्ये हिंगोलीचे दोघेजण गुटख्याची तस्करी करताना आढळून आले. पोलिसांनी गुटखा आणि कार असा एकूण 8 लाख 35 हजार 80 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच रसूल खान सिकंदर खान ( वाहनचालक, रा. मस्तांनशहा नगर हिंगोली) व शेख सिकंदर शेख मुजीब (राहणार महादेववाडी, हिंगोली हल्ली मुक्काम मोमिनपुरा हिंगोली) यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम 328,272,273,269 ,270 ,188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड , पोलीस उपनिरीक्षक बालाजी पुंड , चालक मुटकुळे यांनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास जमादार शेख बाबर करीत आहेत. 

Web Title: Gutkha smugglers found by police in search of thieves; 9 lakh confiscated