शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
3
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
4
Top Marathi News Live: उत्तर महाराष्ट्र अन् मराठवाड्याला 'हीट वेव्ह'चा इशारा; मुंबईसह उत्तर कोकणात उकाडा असह्य होणार
5
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
6
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
7
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
8
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
9
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
10
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
11
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
12
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
13
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
14
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
15
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
16
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
17
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
18
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
19
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
Daily Top 2Weekly Top 5

मुलीचे लग्न दुसरीकडे ठरले; प्रेमी जोडप्याने एकाच दोरीने गळफास घेऊन जीवन संपवले  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 13:19 IST

Love birds suicide at Hingoli मुलीचा विवाह ठरला होता. त्यासाठी तिचे कुटुंबिय त्यांच्या मुळगावी राजदरी(ता. औंढा) येथे जाणार होते.

ठळक मुद्देमयत अजय डुकरे हा परभणी येथील सैनिकी शाळेत शिक्षण घेत होता. 

वारंगा फाटा (जि. हिंगोली) : कळमनुरी तालुक्यातील गुंडलवाडी शिवारात प्रेमीयुगुलाने शेतात एकाच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना ९ एप्रिल रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास उघडकीस आली.  अजय केशव डुकरे (१८) व सरस्वती देवीदास कऱ्हाळे (१७) अशी आत्महत्या केलेल्या प्रेमी युगलाची नावे आहेत. 

या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील गुंडलवाडी येथील अजय केशव डुकरे यांच्या शेतात हळद पिकाची काढणी सुरु आहे. त्यामुळे शेतात रात्रीच्या वेळी जागरण करण्यासाठी जात असे. त्यानुसार ८ एप्रिलच्या रात्री १० वाजता घरी जेवण करून अजय शेतात जातो असे सांगून घराबाहेर पडला. नेहमीच अजय शेतात जात असल्याने घराच्यांनी परवानगी दिली. मात्र, शुक्रवारी सकाळी ( ९ एप्रिल ) काही शेतकऱ्यांना केशव डुकरे यांच्या शेतात अजय आणि सरस्वती एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. 

ही माहिती गावात समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. ग्रामस्थांनी पाहणी केली असता आत्महत्या केलेले अजय डुकरे व सरस्वती कऱ्हाळे असल्याचे स्पष्ट झाले. घटनेची माहिती मिळताच आखाडा बाळापूरचे स.पो.नि. रवीकांत हुडेकर, जमादार भगवान वडकिले यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला आहे. दरम्यान, मयत अजय डुकरे हा परभणी येथील सैनिकी शाळेत शिक्षण घेत होता. तर सरस्वती कऱ्हाळे यांचे वडील गुंडलवाडी येथेच पाच वर्षांपासून सालदार म्हणून काम करतात. सरस्वतीचा विवाह ठरला होता. त्यासाठी तिचे कुटुंबिय त्यांच्या मुळगावी राजदरी(ता. औंढा) येथे जाणार होते. या घटनेप्रकरणी नोंद घेण्याची प्रक्रीया सुरू होती.

टॅग्स :HingoliहिंगोलीDeathमृत्यू