हिंगोली जिल्ह्यातील वाघजळी गावात गॅस्ट्रोची साथ; एक महिला दगावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 15:40 IST2018-07-06T15:39:00+5:302018-07-06T15:40:03+5:30

तालुक्यातील वाघजाळी येथे मागील तीन दिवसापासून गॅस्ट्रोची साथ पसरली असून गावात अतिसाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

Gastro in Waghjali village of Hingoli district; one woman died | हिंगोली जिल्ह्यातील वाघजळी गावात गॅस्ट्रोची साथ; एक महिला दगावली

हिंगोली जिल्ह्यातील वाघजळी गावात गॅस्ट्रोची साथ; एक महिला दगावली

सेनगाव (हिंगोली ) :  तालुक्यातील वाघजाळी येथे मागील तीन दिवसापासून गॅस्ट्रोची साथ पसरली असून गावात अतिसाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. यातच गुरुवारी गॅस्ट्रो ने एक महिला दगावली असल्याने परिसरामध्ये भितीचे वातावरण आहे.

तालुक्यातील वाघजाळी येथे दुषीत पाणी व घाणीच्या साम्राज्याने तीन दिवसापासून गॅस्ट्रोबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. गावात जुलाब व उलट्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. यातच वेळेत उपचार न मिळाल्याने गुरुवारी गिताबाई तांबीले (५०) या महिलेचा मृत्यू झाला आहे.
यासोबतच गावातील अनेक रूग्णांना या आजाराची लागण झाली आहे. त्यामध्ये गौकर्ण बाबाराव तांबीले (30), कल्पना ध्रुव तांबीले (२५), भागवत काशीराम तांबीले (36), माधव सोनुने (४२), हरिदास अवचार (४६) सह अनेक रुग्णांना ग्रासले आहे. 

Web Title: Gastro in Waghjali village of Hingoli district; one woman died