गॅस सिलेंडरचा स्फोट; लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 00:59 IST2018-04-13T00:59:26+5:302018-04-13T00:59:26+5:30

येथील गुरद्वारा दमदमा साहीब परिसरातील एका घराला आग लागली. आगीत गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटात गृहोपयोगी साहित्य जळून खाक झाले. सात ते आठ लाख रुपयांचे नुकसान झाले.

 Gas Cylinder Blast; Loss of millions | गॅस सिलेंडरचा स्फोट; लाखोंचे नुकसान

गॅस सिलेंडरचा स्फोट; लाखोंचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क
वसमत : येथील गुरद्वारा दमदमा साहीब परिसरातील एका घराला आग लागली. आगीत गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटात गृहोपयोगी साहित्य जळून खाक झाले. सात ते आठ लाख रुपयांचे नुकसान झाले.
वसमत येथील गुरूद्वारा दमदमा साहेब येथील पुजारी राजेंद्रसिंग भोसीवाले हे त्यांच्या घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. बुधवारी मध्यरात्रीनंतर घराला अचानक आग लागली. परिसरातील नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करताच घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. त्यामुळे आग भडकली. अग्निशामक दल पोलीस व परिसरातील रहिवाशांनी आग नियंत्रणात आणली. मात्र घरातील संसारोपयोगी साहित्य, कपडे, रोख व कपाटातील दागिणे, फर्निचर असा सात ते आठ लाखांचा ऐवज आगीत जळून खाक झाला. घटनास्थळी पोनि उदयसिंह चंदेल यांनी भेट दिली.

Web Title:  Gas Cylinder Blast; Loss of millions