शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

पंचायत समिती सभापतीच्याच घरी जुगार; उपसभापती, दोन सदस्यांसह ११ जणांना पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 12:43 PM

औंढा नागनाथ येथे पंचायत समितीच्या कॅम्पस्मध्ये सभापती, कर्मचारी व अधिकाऱ्यांची निवासस्थाने आहेत.

ठळक मुद्देशासकीय निवासस्थानात जुगाऱ्यांना आश्रय निवस्थानात जुगार व मद्य प्राशन नित्याचेच

औंढा नागनाथ (जि. हिंगोली) : औंढा  पंचायत समितीच्या सभापती संगीता ढेकळे यांच्या निवासस्थानी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी सोमवारी सायंकाळी ५.३०  वाजता धाड टाकून उपसभापती, दोन पं.स. सदस्यांसह ११ जणांना पकडले.  पोलिसांनी येथून रोख रकमेसह २ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.  

औंढा नागनाथ येथे पंचायत समितीच्या कॅम्पस्मध्ये सभापती, कर्मचारी व अधिकाऱ्यांची निवासस्थाने आहेत. विद्यमान सभापती संगीता ढेकळे यांच्या निवासस्थानी मोकळ्या जागेत जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंढे यांना मिळाली. त्यांनी जमादार अफसर पठाण, जमादार गणेश नारोटे, पंजाब थिटे,   बंडू घुगे, इकबाल शेख, ज्ञानेश्वर गोरे, अमोल चव्हाण, खिजर पाशा यांना सोबत घेऊन धाड मारली.  यावेळी शिवसेनेचे उपसभापती भीमराव कºहाळे,  पं.स. सदस्य बालाजी बोडखे, भगवान कदम, तसेच पंडित लोणसाने, गजानन नागरे, निवृत्ती कदम, मुंजाजी टोम्पे, विजय वाघमारे, राजेश्वर गारकर, तुकाराम गायकवाड,  राजेश चव्हाण या अकरा जणांना जुगार खेळताना पकडले. तर एक जण फरार झाला. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.  

शासकीय निवासस्थानात जुगाऱ्यांना आश्रय यापूर्वी पुढाऱ्यांच्या शेतात, आखाड्यावर धाड पडल्याचे प्रकार घडले. मात्र, आज पहिल्यांदाच पंचायत समिती सभापतींच्या निवासस्थानी पदाधिकारी व सदस्य जुगार खेळताना आढळून आले. सोमवारी या कार्यालयातील एक कर्मचारी कोरोनाबाधित असल्याने हे कार्यालय तीन दिवसांसाठी बंद केले आहे. हा भाग प्रतिबंधित केला आहे. त्याचा फायदा घेत हा प्रकार राजरोसपणे सुरू होता. एरवीही पदाधिकारी कुटुंबियांसह येथे राहत नसल्याने जुगार व मद्य प्राशन नित्याचेच असल्याचे काहींनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोलीPoliceपोलिसpanchayat samitiपंचायत समिती