एरिगेशन कॅम्प येथे फ्री स्टाईल हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 01:26 IST2018-04-17T01:26:00+5:302018-04-17T01:26:00+5:30

येथील एरिगेशन कॅम्प वसाहतीतील रस्त्यावर १५ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास तरूणांच्या दोन गटांत फ्री स्टाईल हाणामारी झाली.

 Freestyle Shot at the Arrival Camp | एरिगेशन कॅम्प येथे फ्री स्टाईल हाणामारी

एरिगेशन कॅम्प येथे फ्री स्टाईल हाणामारी

आखाडा बाळापूर : येथील एरिगेशन कॅम्प वसाहतीतील रस्त्यावर १५ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास तरूणांच्या दोन गटांत फ्री स्टाईल हाणामारी झाली. किरकोळ कारणावरून झालेल्या हाणामारीत दगड अन् काठ्यांचा वापर केल्याने एकाचे डोेके फुटले. याप्रकरणी परस्परांविरोधी तक्रारीवरून दहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापैकी चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी बबन तुळशीराम बोधनकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोहसीन, शेख सलीम शेख करीमोद्दीन, शेख खदीर शेख करीमोद्दीन, शेख नवाब शेख करीमोद्दीन, शेख मतीन शेख करीमोद्दीन, शंकर नेव्हल यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला. जुन्या भांडणाच्या कारणावरून संगनमत करून दगड, काठ्याने मारहाण करून डोक्यात मारून जखमी केले. शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तर शेख खदीर शेख करीमोद्दीन याने परस्पर विरोधी तक्रार दिली. त्यात मी रस्त्याने जात असताना ‘तू आमच्या घराकडे का पाहतोस’ असे म्हणून रस्त्यात अडवून मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी दिल्याचे नमूद आहे. त्यावरून विशाल बोधनकर, भारत बोधनकर, प्रदीप बोधनकर व बबनराव बोधनकर यांच्यावर गुन्हा दाखल केला. तपास पोनि व्ही.एस. केंद्रे करीत आहेत.

Web Title:  Freestyle Shot at the Arrival Camp