रखडलेल्या पुलाच्या कामाने घेतला चौघांचा बळी, मृत लोणार तालुक्यातील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 09:10 IST2021-06-14T09:03:36+5:302021-06-14T09:10:46+5:30
Accident at Sengaon चौघे मृत लोणार तालुक्यातील खळेगाव, पळखेडा , धानोरा इथले रहिवाशी आहेत.

रखडलेल्या पुलाच्या कामाने घेतला चौघांचा बळी, मृत लोणार तालुक्यातील
सेनगाव ( हिंगोली ) :जिंतूर -सेनगाव रस्त्यावर भरधाव कार पुलाचे काम चालू असलेल्या खड्डात पडली. या भीषण अपघातात खड्डयात साचलेल्या पावसाच्या पाण्यात कार बुडून चार जणांचा गुदमरून मृत्यू झाला. ही घटना रविवारी मध्यरात्री घडली.
शहराजवळ सेनगाव -जिंतूर रस्त्यावर रविवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास भरधाव वेगाने येणारी कार पुलाचे काम चालू असलेल्या खड्डयात पडली. खड्ड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी असल्याने कार पाण्यात बुडाली. कारचे काच बंद असल्याने त्यातील विजय ठाकरे रा.धानोरा,गजानन सानप,त्रंबक थोरवे या सह अन्य एक असे लोणार तालुक्यातील चार जणांचा मृत्यू झाला. रात्रीच्या दरम्यान रस्त्यावर वाहतूक नसल्याने हा प्रकार उशिरा लक्षात आला. मदत मिळेपर्यंत गाडीमधील चार ही जणांचा मृत्यू झाला होता. मृत चौघेही आपल्या मुलांना क्लासेस लावण्यासाठी नांदेड येथे गेले होते.परत येत असताना दुदैवी प्रकार घडला.