शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

काॅन्टॅक्ट ट्रेसिंगचा पडला विसर; पाॅझिटिव्हच्या संपर्कातील मोकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क हिंगोली : कोरोनाबाधितांची संख्या पाहता, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग तसे कमीच होत आहे. आजघडीला शासनाच्या नियमाप्रमाणे हिंगोली जिल्ह्याची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

हिंगोली : कोरोनाबाधितांची संख्या पाहता, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग तसे कमीच होत आहे. आजघडीला शासनाच्या नियमाप्रमाणे हिंगोली जिल्ह्याची ट्रेसिंग ही एका कोरोनाबाधितामागे २३ अशीच आहे. खरे पाहिले तर ही संख्या ३०वर न्यायला हवी. परंतु, तसे होताना आजतरी दिसत नाही.

फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दोन अंकी संख्या कोरोनाने केव्हाच पार केली आहे. मागील दोन आठवड्यांपासून तर रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. जिल्हा प्रशासनाने कोरोनाबाधितांची होत असलेली वाढ पाहून बसस्थानक, रेल्वे स्थानक आदी ठिकाणी अँटिजेन, आरटीपीसीआर तपासणी करण्याची व्यवस्था केली आहे. परंतु, याठिकाणी अँटिजेन तपासणीवेळी कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यानंतर तो इतरांना बोलतो. एवढेच काय हातमिळवणी सुद्धा करतो, हे अनेकांनी पाहिले आहे.

पॉझिटिव्ह रुग्ण निघाल्यानंतर पंधरा-वीस मिनिटात कोरोना सेंटरवरून गाडी यायला हवी. परंतु, संबंधितांनी सांगूनही कोरोना सेंटरवरील गाडी वेळेवर येत नाही. त्यामुळे हा कोरोनाबाधित रुग्ण इतरांशी गप्पा मारत बसतो. मध्यंतरी बसस्थानकात कोरोना पॉझिटिव्ह निघालेल्या दोन महिला पळून जाण्याचा प्रयत्न करत होत्या. पोलिसांच्या मदतीने या दोन महिलांना पकडून आणून कोरोना सेंटरवर दाखल केले आहे.

२३ मार्च २०२०पासून कोरोनाने सर्वत्र शिरकाव केला. तेव्हापासून बाधितांचा ट्रेस करण्याची संख्या २३ आहे. खरं पाहिलं तर एका कोरोनाबाधितांच्या मागे ३५ संख्या असायला हवी. विशेष म्हणजे यात सातत्य ठेवायला पाहिजे. कोरोनाबाधित रुग्ण निघाल्यास त्याला पायबंद करून एकाच जागी बसविण्यात आल्यास इतरांना त्याची इजा पोहोचणार नाही आणि कोरोनाला आळा बसेल. कोरोना रुग्ण वाढल्याचे पाहून जिल्हा प्रशासनाने दिनांक १ मार्च ते ७ मार्च आणि २९ मार्च ते ४ एप्रिल या दरम्यान दोनवेळा टाळेबंदी केली. परंतु, अजूनही काही कोरोनाबाधित रुग्ण हे मोकाटपणे फिरताना दिसून येत आहेत.