शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

हिंगोलीत असना नदीचे उग्ररुप; कुरुंदा, कौठा गावांना पुराचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2020 10:36 IST

कुरुंदा येथे साडेतीन तासात तब्बल ९२ मिमी पावसाची नोंद

ठळक मुद्देकापूस,सोयाबीन, हळद या उत्पादकांचे अतोनात नुकसानघरात पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ

हिंगोली : कुरुंदा येथे शुक्रवारी रात्री 2 ते सकाळी 5.30वाजेपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे जलेशवर (असना)नदीचे पात्र ओलांडून गावात महापूर आला. अनेक घरात पाणी घरात पाणी शिरल्याने पुराचा तडाखा नागरिकांना बसला आहे. नदी ,नाल्याकाठचे शेताची खरडाखरडी झाल्याने कापुस, सोयाबीन या पीकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

कुरुंदा येथे जवळपास 3.30 तास सलग पाऊस झाल्याने या भागातील कुरुंदा, डोनवाडा, सुकळी, कोठारी, कुरुंदवाडी गावातील नदी ,नाले दुथडी भरून शेतांनी पाणी वाहत होते.शुक्रवारी रात्री 92 मिमी पाऊस झाल्याची नोंद असून या पावसाळ्यात हा या भागात सर्वात मोठा पाऊस होता.

कुरुंदा नदीचे पात्र ओलांडून रस्त्याने गुडघ्याऐवळे पाणी वाहत होते.गावातील पाणी बाहेर जाण्यासाठी मार्ग नसल्याने हे पाणी चक्क अनेक वस्तीतील घरात शिरले.गणेश नगर,आरामशिन भाग,लवहुजी नगर ,श्रीवस्ती नगर,साईबाबा गल्ली,संत तुकाराम महाराज गल्ली, रायगड नगर,दर्गा मोहल्ला या वस्तीतील शेकडो घरात पाणी शिरले होते.त्यामुळे संसारउपयोगी साहित्याचे अतोनात नुकसान झाले परंतु जीवितहानी झाली नाही.रात्री पासून घरात पाणी शिरू लागल्याने काहीनी पत्रावर तर काहीनी उंच ठिकाणी, शेजारच्या इमारतीत थांबण्याची वेळ नागरिकावर आली होती. गावातील पाणी थेट नदीत जाण्यासाठी कोणताच नाला नसून ग्रा प गाळेच्या  पाठीमागचे पाणी बाहेर जाण्यासाठी कोणतीच ठोस उपायोजना नाही त्याकडे ग्रा.प. दुर्लक्ष दिसते. 

दरवर्षी महापुरचा फटका बसला परंतु ठोस उपाययोजना आखल्या जात नाही.अनेक वस्तीसह गावातील दुर्गामाता मंदीराला पाण्याने वेढले होते.नदी ,नाल्याचे पाणी शेतात वाहत असल्याने कापूस,सोयाबीन, हळद या उत्पादकांचे अतोनात नुकसान झाल्याचे चित्र दिसते.या पुराचा शेतीला मोठा तडाखा बसला आहे.कुरुंदयासह कोठारी,डोणवडा,सुकळी, कुरुंदवाडी, या गावातील शेतीचे नुकसान झाले आहे.2016 मध्ये 29 जून रोजी ढगफुटी झाली होती तेव्हा 144 मिमी सर्वाधिक पाऊस झाला होता.पुरात झालेल्या नुकसानाची पाहणी करिता एकही वरीष्ठ अधिकारी कुरुंदयाकडे फिरकला नाही.

कौठा गावालाही तडाखा 

कौठ्यात ही असना नदीचा प्रकोप झाला असून प्रचंड महापूर आलेला आहे, नदीकाठचा पूर्ण परिसर जलमय झालेला असून  सकाळी ३ ते ५ दरम्यान ढगफुटी सारखा पाऊस झाला असून अजूनही आभाळ भरून आहे,नदीकाठची शेती खरडून गेली असून वसमत कौठा कुरुंदा मार्गावरील तोंडपुसी ओढ्याला ही पुरामुळे शेतीचे नुकसान झाले आहे

टॅग्स :Hingoliहिंगोलीfloodपूरriverनदी