पेटत्या अगरबत्तीने दानपेटी स्वाहा; कृष्णापूर येथील महादेव मंदिरातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 15:29 IST2018-05-29T15:29:03+5:302018-05-29T15:29:03+5:30
कृष्णापूर येथील महादेव मंदिरातील दानपेटीला आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास अगरबत्तीमुळे आग लागली. दर्शनासाठी तेथे उपस्थित भक्तांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी आग तत्काळ विझवली.

पेटत्या अगरबत्तीने दानपेटी स्वाहा; कृष्णापूर येथील महादेव मंदिरातील घटना
आखाडा बाळापूर (हिंगोली ) : कृष्णापूर येथील महादेव मंदिरातील दानपेटीला आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास अगरबत्तीमुळे आग लागली. दर्शनासाठी तेथे उपस्थित भक्तांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी आग तत्काळ विझवली.
तालुक्यातील कृष्णापूर येथील महादेव मंदीर प्रसिध्द आहे. बाळापुरसह कळमनुरी, हदगाव तालुक्यामधून भक्त येथे दर्शनासाठी येतात. आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास येथील दानपेटीला अचानक आग लागली. दानपेटीमधून मोठ्याप्रमाणावर धूर निघत असल्याने उपस्थित भक्तांचे तिकडे लक्ष गेले. तेव्हा त्यांनी तत्काळ पेटीवर पाणी टाकत आग विझवली.
यानंतर येथील पुजार्याने विश्वस्त मंडळ व बाळापूर पोलिसांना याची माहिती दिली. ठाणेदार व्यंकट केंद्रे व विश्वस्तमंडळ आल्यानंतर दानपेटी उघडण्यात आली. यावेळी त्यात अर्धवट जळलेल्या नोटा व अगरबत्तीच्या काड्या आढळून आल्या. त्यामुळे कोणीतरी भक्ताने दानपेटीवर अगरबत्ती लावल्यानेच आग लागली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.