आत्महत्याग्रस्त कुटुंंबांना नागनाथ संस्थानच्या वतीने अर्थसहाय्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 01:14 IST2018-07-02T01:13:43+5:302018-07-02T01:14:05+5:30
आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा संस्थानच्या वतीने आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटूंबातील सदस्यांना पेरणी, शिक्षणासाठी प्रत्येकी ५ हजार रुपये प्रमाणे २५ शेतकरी कुटुंबियांना धनादेशाचे वाटप करण्यात आले.

आत्महत्याग्रस्त कुटुंंबांना नागनाथ संस्थानच्या वतीने अर्थसहाय्य
लोकमत न्यूज नेटवर्क
औंढा नागनाथ : आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा संस्थानच्या वतीने आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटूंबातील सदस्यांना पेरणी, शिक्षणासाठी प्रत्येकी ५ हजार रुपये प्रमाणे २५ शेतकरी कुटुंबियांना धनादेशाचे वाटप करण्यात आले.
नागनाथ मंदिरामध्ये विश्वस्त व सल्लागार मंडळाच्या बैठकीत आत्महत्याग्रस्त गरजवंत कुटुंबियांना अर्थसहाय्य वाटप करण्याच्या सूचना आ.डॉ.संतोष टारफे यांनी दिल्या होत्या. याला सहाय्यक धर्मादाय आयुक्त हिंगोली यांनी परवानगी देवून यासाठी खास दानपेटी बसविण्यात आली होती. यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून मदत करण्याचे ठरवले. त्या अनुषंगाने तालुक्यातील २३ पात्र आत्महत्याग्रस्त शेतकरी तर दोन पात्र कुटुंबियांना पेरणी व शैक्षणिक कामासाठी प्रत्येकी पाच हजार रुपये प्रमाणे २५ लाभार्थ्यांना सव्वा लाखांचे धनादेश वाटप केले. यावेळी संस्थान अध्यक्ष पांडुरंग माचेवाड, विश्वस्त डॉ.पुरूषोत्तम देव, अॅड. मुंजाभाऊ मगर, गजानन वाखरकर, गणेश देशमुख, प्रा.देविदास कदम, डॉ. विलास खरात, महेश बियाणी, अॅड. राजेंद्रअग्रवाल, डॉ. किशन लखमावार, डॉ. आनंद निलावार, पंजाबराव गव्हाणकर, वैजनाथ पवार, शंकर काळे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.