शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

अखेर शिबू पुजारीलाही केले अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2018 12:35 AM

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सर्जेराव पोले खून प्रकरणातील मुख्य आरोपी सुब्रमण्यमा ऊर्फ शिबूअप्पा चन्नाअप्पा मढिवाल ऊर्फ पुजारी (२९) (रा.हडीगुल, ता. थिरथाहली, जि.शिवमोगा, कर्नाटक) यास सेनगाव पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या आधारे अखेर अकरा महिन्यानंतर हडीगुल येथून ताब्यात घेतले. रविवारी दुपारी तीन वाजता ही कारवाई केली.

लोकमत न्यूज नेटवर्कसेनगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सर्जेराव पोले खून प्रकरणातील मुख्य आरोपी सुब्रमण्यमा ऊर्फ शिबूअप्पा चन्नाअप्पा मढिवाल ऊर्फ पुजारी (२९) (रा.हडीगुल, ता. थिरथाहली, जि.शिवमोगा, कर्नाटक) यास सेनगाव पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या आधारे अखेर अकरा महिन्यानंतर हडीगुल येथून ताब्यात घेतले. रविवारी दुपारी तीन वाजता ही कारवाई केली.तालुक्यातील वडहिवरा येथील माजी पंचायत समिती सदस्य व बाजार समिती संचालक सर्जेराव पोले (५५) यांचा एक जानेवारी २0१८ रोजी अपहरण करुन खून केला होता. जमिनीच्या वादातून अत्यंत शिताफीने सुपारी देवून घडलेल्या या प्रकाराने राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती. या खुनाचा सेनगाव पोलिसांनी ४८ तासांत उलगडा केला होता. पंरतु प्रमुख मारेकरी मात्र सापडत नव्हते. तपास अधिकारी या खून प्रकरणातील आरोपी शरण येण्याची तर वाट पाहत नाही ना? असा प्रश्न निर्माण झाला होता. यात पोलिसांनी रतन हरिभाऊ खटके (रा.रामपुरी, ता.पाथरी) याच्यासह विजय देवकर, हरीश बाबूराव मिरेकर, इम्रान युनूस शेख सर्व रा.नाशिक यांना सुरवातीला अटक केली होती. त्यानंतर सुपारी देणारा मुख्य आरोपी हरिभाऊ सातपुते रा.नाशिक यास तब्बल दहा महिन्यानंतर अटक केली होती. तर दुसरा प्रमुख आरोपी शिबूअप्पा अद्याप फारार होता. मागील अकरा महिन्यापासून त्याचा शोध सुरू होता. पंरतु कोणतेही धागधोरे हाती लागत नव्हते. सदर आरोपी कर्नाटक राज्यातील असल्याने तपासात मोठी अडचण येत होती.आरोपीचा शोधासाठी पोलिसांनी आरोपीचे सध्याचे वास्तव्य असलेल्या नाशिक व परिसरात मोठ्या प्रमाणात शोध घेतला. पंरतु तो सापडत नव्हता. त्याच्या मूळ गावाचा शोध लागत नव्हता. असे असताना पोलिसांनी आरोपी वापरत असलेल्या मोबाईलचा शोध लावला. त्याआधारे त्याच्या मूळ गावाचा शोध लावला. पोलीस पथकाने नक्षलग्रस्त भागात जावून कानडी भाषेची मोठी अडचण असतानाही रविवारी दुपारी ३ वाजता आरोपीला घरातून ताब्यात घेतले. या आरोपीकडून खून प्रकरणात वापरलेल्या कारचा शोधही पोलीस पथकाने लावला.सुपारी देणारा आरोपी हरिभाऊ सातपुते याने सुपारीची रक्कम दिली नसल्याने आरोपी शिबूअप्पा हा सुपारीच्या रक्कमेत कारच घेवून गेला होता. पंरतु घटनेनंतर आठच दिवसांनी सदर कारचा कर्नाटकमध्ये अपघात झाला. त्यामुळे खुन प्रकरणातील वाहन अनंतपुरा, जि.शिवमोगा येथे एका गॅरेजवर लावली होती. अखेर सेनगाव पोलिसानी उशिरा का होईना आरोपीस अटक केली आहे. पोलीस निरीक्षक सरदार सिंह ठाकूर, पो.काँ.अनिल भारती, मंचक ढाकरे, प्रंशात नरडीले आदींच्या पथकाने ही कामगिरी बजावली.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी