सततच्या नापिकीला कंटाळून नालेगाव येथे शेतकर्याची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2017 19:31 IST2017-12-18T19:31:07+5:302017-12-18T19:31:41+5:30
औंढा नागनाथ तालुक्यातील नालेगाव येथे सततच्या नापिकीला कंटाळून शेतकर्यांने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची आज सकाळी ९ च्या सुमारास उघडकिस आली. मारोती तुकाराम राखोंडे (५५) असे मयत शेतकर्याचे नाव आहे.

सततच्या नापिकीला कंटाळून नालेगाव येथे शेतकर्याची आत्महत्या
हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील नालेगाव येथे सततच्या नापिकीला कंटाळून शेतकर्यांने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची आज सकाळी ९ च्या सुमारास उघडकिस आली. मारोती तुकाराम राखोंडे (५५) असे मयत शेतकर्याचे नाव आहे.
मारोती यांच्या नावे दीड एकर शेती असून त्यांच्यावर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ७ हजार कर्ज सुद्धा आहे. यातच सततच्या नापिकीमुळे ते नैराश्यात होते. यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचे त्यांच्या कुटूंबातील व्यक्तीने सांगितले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे. घटनास्थळी चौकीचे जमादार शेख खुद्दूस, सचिन चाबुकस्वार, अरविंद गजभार, अंबादास विभूते, सय्यद शायद यांनी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. हट्टा पोलीसात नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती.