डिग्रस येथे शेतकर्याचा जळालेला मृतदेह सापडला; पोलिसांचा तपास खुनाच्या दिशेने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 17:36 IST2018-02-15T17:30:51+5:302018-02-15T17:36:36+5:30
डिग्रस क-हाळे येथील एका शेतकर्याचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळुन आल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. सदर घटना आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

डिग्रस येथे शेतकर्याचा जळालेला मृतदेह सापडला; पोलिसांचा तपास खुनाच्या दिशेने
हिंगोली : तालुक्यातील डिग्रस क-हाळे येथील एका शेतकर्याचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळुन आल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. सदर घटना आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. पोलिसांनी अधिक तपास सुरु केला असून अद्याप मृत्यूचे कारण अस्पष्ट आहे.
मृत शेतकर्याचे नाव गंगाधर गोविंदराव राखुंडे (५०) आहे. आज सकाळी राखुंडे यांच्या घरातून धूर निघत असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी पोलिसांना माहिती दिली. यानंतर घटनास्थळी हिंगोली ग्रामीण ठाण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर भोरे, पोनि जगदीश भंडरवार व पथकाने भेट देऊन पंचनामा केला. याबाबत पोलिसांनी अधिक तपास सुरु केला आहे. पोलीस सूत्रांच्या अंदाजानुसार ही आत्महत्या नसून खुनाचा प्रकार आहे.