वसमत येथे गॅस सिलेंडरच्या स्फोटात पुजाऱ्याचे घर जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 18:54 IST2018-04-12T18:54:55+5:302018-04-12T18:54:55+5:30
येथील गुरद्वारा दमदमा साहेब परिसरातील एका घराला आग लागली. आगीत गॅस सिलेंडरचा स्फोट झाला.

वसमत येथे गॅस सिलेंडरच्या स्फोटात पुजाऱ्याचे घर जळून खाक
वसमत (नांदेड ) : येथील गुरद्वारा दमदमा साहेब परिसरातील एका घराला आग लागली. आगीत गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटात गृहपयोगी साहित्य जळून खाक झाले. यामुळे सात ते आठ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
वसमत येथील गुरूद्वारा दमदमा साहेब येथील पुजारी राजेद्रसिंग भोसीवाले हे त्यांच्या घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. बुधवारी मध्यरात्रीनंतर घराला अचानक आग लागली. परिसरातील नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करताच घरातील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. त्यामुळे आग भडकली. अग्नीशामक दल पोलीस व परिसरातील रहिवाशांनी आग नियंत्रणात आणली. मात्र घरातील संसारोपयोगी साहित्य, कपडे, रोख व कपाटातील दागिणे, फर्निचर असा सात ते आठ लाख रुपयांचा ऐवज आगीत जळून खाक झाला. घटनास्थळाची पोनि उदयसिंह चंदेल व कर्मचाऱ्यांनी पाहणी केली.