खळबळजनक! भरदिवसा शासकीय कार्यालयात घुसून कृषी पर्यवेक्षकाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 05:09 PM2024-03-14T17:09:14+5:302024-03-14T17:12:00+5:30

रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह;  कार्यालयातच धारदार हत्याराने केली हत्या

Exciting! Agricultural supervisor was killed in the government office of Akhada balapur | खळबळजनक! भरदिवसा शासकीय कार्यालयात घुसून कृषी पर्यवेक्षकाची हत्या

खळबळजनक! भरदिवसा शासकीय कार्यालयात घुसून कृषी पर्यवेक्षकाची हत्या

- रमेश कदम
आखाडा बाळापूर (हिंगोली):
आखाडा बाळापूर येथील कृषी संशोधन व बीजगुणन केंद्राचे प्रमुख कृषी पर्यवेक्षक यांचा कार्यालयातच अज्ञाताने धारदार शस्त्राने खून केल्याचे आज दुपारी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. राजेश शिवाजीराव कोल्हाळ असे मृताचे नाव आहे. छाती, हातावर धारदार शस्त्राचे वार केल्याने कोल्हाळ यांचा जागीच मृत्यू झाला. कार्यालयातच त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला.

नांदेड - हिंगोली रोडवर आखाडा बाळापूर नजीकच कृषी विभागाचे बीजगुणकेंद्र तथा कृषी संशोधन केंद्र आहे . येथे शेतीवर संशोधन व बीजगुणनाचे काम केले जाते. या ठिकाणी राजेश शिवाजीराव कोल्हाळ ( वय  36  , राहणार कोंडवाडा , तालुका सेनगाव ) हे बीजगुणन केंद्राचे प्रमुख तथा कृषी पर्यवेक्षक म्हणून कार्यरत होते. आज सकाळी साडेअकरा वाजता ते कार्यालयात येऊन नियमित कामकाज करत होते. दुपारी कामानिमित्त काही कामगार कार्यालयात आले असता त्यांना कोल्हाळ यांचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह आढळून आला. या घटनेने एकच खळबळ माजली. 

माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी थोरात, ठाणेदार सुनील गोपीनवार , पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बोंडले आणि पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिस अधिक तपास करत असून ठसे आणि श्वान पथकाला पाचरण करण्यात आले आहे.

Web Title: Exciting! Agricultural supervisor was killed in the government office of Akhada balapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.