बदल्यांमध्ये पती-पत्नी एकत्रिकरणास कोलदांडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 00:10 IST2018-07-14T00:10:43+5:302018-07-14T00:10:57+5:30
जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रियेत पती-पत्नी एकत्रिकरणाच्या नियमाला प्रशासनाने कोलदांडा दिला असून बदलीच्या रॅन्डम राऊंडमध्ये तर अनेक पती-पत्नी एकत्रिकरणातील शिक्षक तालुक्याबाहेर बदलीने गेले आहे.

बदल्यांमध्ये पती-पत्नी एकत्रिकरणास कोलदांडा
लोकमत न्यूज नेटवर्क
कळमनुरी : जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रियेत पती-पत्नी एकत्रिकरणाच्या नियमाला प्रशासनाने कोलदांडा दिला असून बदलीच्या रॅन्डम राऊंडमध्ये तर अनेक पती-पत्नी एकत्रिकरणातील शिक्षक तालुक्याबाहेर बदलीने गेले आहे.
पती-पत्नी एकत्रिकरणाच्या नियमात दोघेही ३० कि.मी.च्या आत असणे गरजेचे आहे. परंतु एन.आय.सी. पुणे यांनी या नियमाला बगल दिली आहे. १० वर्षे सेवा झालेले सर्वच शिक्षक बदलीस पात्र ठरले होते. मोठ्या प्रमाणावर शिक्षकांच्या आॅनलाईन बदल्या झाल्या. जिल्ह्यात सर्वांत जास्त महिला शिक्षिका विस्थापित झाल्या होत्या. या विस्थापित झालेल्या महिला शिक्षिकांना तालुक्याबाहेर पदस्थापना देण्यात आली. जिल्ह्यातील जवळपास ५० ते ६० जोडप्यांची बदल्यात गैरसोय झाली. रॅन्डम राऊंडमध्ये महिला शिक्षिकांचा विचार न करता कोठेही पदस्थापना देण्यात आली आहे. काही पती-पत्नी शिक्षकांचे दोघांच्या शाळामधील अंतर ८० ते ९० कि.मी. आहे. त्यांचे कुटूंबच विस्कळीत झाले असून त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे ३० कि.मी.च्या आत पदस्थापना देण्याची मागणी केली आहे. क
ाही महिला शिक्षिकांना दुर्गम भागातही पदस्थापना दिल्याचे समजते. शाळेत जाणे-येण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्याने महिला शिक्षिका बेजार झाल्या आहेत. कोठेही पदस्थापना मिळाल्याने त्यांचे कुटूंब विस्कळीत झाले आहे. पती-पत्नी एकत्रिकरणमधील शिक्षकांची बैठक झाली. ३० किमीच्या आत पदस्थापना देण्यासाठी ते आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत.