शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
5
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
6
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
7
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
8
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
9
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
10
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
11
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
12
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
13
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
15
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
16
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
17
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
18
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
19
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
20
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू

गंगाखेड शुगरला ईडीचा दणका ! कळमनुरी तालुक्यातील ३९ हेक्टर जमीन केली सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2022 20:34 IST

ईडीचे अधिकारी ४ जानेवारी रोजी तहसील कार्यालयात दाखल झाले. तहसीलदार सुरेखा नांदे यांच्याशी या जमिनीबाबत चर्चा करून त्यांनी मनुष्यबळ मागितले.

कळमनुरी ( हिंगोली ) : तालुक्यातील वाकोडी व खापरखेडा शेतशिवारात गंगाखेड शुगर अॅण्ड एजन्सी लिमिटेड विजयनगर माखणीतर्फे मुख्य शेतकरी अधिकारी नंदकिशोर रतनलाल शर्मा यांच्या नावाने असलेली ३९.३७ हेक्टर जमीन अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने ४ जानेवारी रोजी सील केली. यासाठी तहसीलच्या मंडळ अधिकारी व तलाठ्यांना सोबत घेतले होते.

ईडीचे अधिकारी ४ जानेवारी रोजी तहसील कार्यालयात दाखल झाले. तहसीलदार सुरेखा नांदे यांच्याशी या जमिनीबाबत चर्चा करून त्यांनी मनुष्यबळ मागितले. वाकोडी, खापरखेडा येथील जमीन सील करावयाची आहे, असे सांगितले. आपल्यासोबत मंडळ अधिकारी व तलाठी यांना घेऊन ते वाकोडी व खापरखेडा शिवारात गेले. मंडळ अधिकारी व तलाठी यांनी या पथकाला गंगाखेड शुगर अँड एजन्सी लिमिटेड विजय नगर माखणीतर्फे मुख्य शेतकरी अधिकारी नंदकिशोर रतनलाल शर्मा रा. उमरखेड यांच्या नावे असलेली जमीन दाखविली.

वाकोडी व खापरखेडा येथे जाऊन या अधिकाऱ्यांनी जमिनीला सील लावले. तसे फलकही उभे केले. गंगाखेड शुगर अँड एजन्सीची वाकोडी येथील सर्वे क्रमांक ९८ मधील १०.७३ हेक्टर, सर्वे क्रमांक ८६ मधील २.८४ हेक्टर, सर्वे क्रमांक ८७ मध्ये ७.९९ हेक्टर व खापरखेडा येथील सर्वे क्रमांक १४२ मधील १४ हेक्टर, सर्वे क्रमांक १३७ मधील ३.८० हेक्टर जमीन आहे. वाकोडी शिवारातील २१.५७ हेक्टर व खापरखेडा शिवारातील १७.८० हेक्टर अशी एकूण ३९.३७ हेक्टर जमीन आहे. ही जमीन ईडीच्या पथकाने सील केल्याचा फलकही लावण्यात आलेला आहे. ईडीच्या पथकासोबत मंडळ अधिकारी किरण पावडे, तलाठी गंगाधर पाखरे, रेवता लुटे व ग्रामस्थ उपस्थित होते.

ईडीच्या पथकाला जमीन दाखविलीईडीचे अधिकारी माझ्याकडे आले होते. त्यांनी वाकोडी व खापरखेडा येथील काही सर्व गटांमधील जमीन दाखविण्यासाठी मंडळ अधिकारी व तलाठ्यांना आमच्यासोबत पाठवा, असे सांगितले. त्यानुसार मी मंडळ अधिकारी व दोन तलाठ्यांना ईडीच्या अधिकाऱ्यांसोबत पाठविले. त्यांनी वाकोडी व खापरखेडा येथे जाऊन त्या सर्व्हे क्रमांकाच्या जागेचा पंचनामा करीत जागा ताब्यात घेतली. त्या जागेवर त्यांचा फलक लावला आहे, असे तहसीलदार सुरेखा नांदे यांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयHingoliहिंगोली