Economic revolution is possible if women come together | महिला एकत्र आल्या तर आर्थिक क्रांती शक्य

महिला एकत्र आल्या तर आर्थिक क्रांती शक्य

वसमत: महिला सर्वच क्षेत्रांत आघाडीवर आहेत. बँकिंग क्षेत्रातही महिला भरीव कामगिरी करू शकतात. हे वसमतच्या जिजाऊ महिला पतसंस्थेच्या प्रगतीवरून स्पष्ट होत असल्याचे प्रतिपादन आ. राजू पाटील नवघरे यांनी केले.

वसमत येथे जिजाऊ महिला पतसंस्थेच्या वतीने महिला सादरीकरण मेळावा घेण्यात आला. त्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. वसमत येथील जिजाऊ महिला नागरी पतसंस्थेत महिला सक्षमीकरण मेळावा झाला. कार्यक्रमास ब्रिगेडीयर सुधीर सावंत, काँग्रेस नेते डॉ. एम. आर. क्यातमवार, डॉ. गंगाधर काळे, शंकरराव कदम, व्यंकटराव जाधव, चेअरमन रंजना जाधव यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी ब्रिगेडीयर सुधीर सावंत, डॉ. क्यातमवार यांनी पतसंस्थेच्या प्रगतीचे कौतुक केले. कार्यक्रमासाठी संदीप नवघरे, मनीषा कऱ्हाळे, दत्ता पांचाळ, सुरेश रागल्ला, राखोंडे आदींनी परिश्रम घेतले. फाेटाे नं. ३२

Web Title: Economic revolution is possible if women come together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.